Innocent : दिवंगत माजी आमदार अनिल राठोडांसह शिवसैनिक निर्दोष; केडगाव हत्याकांड दगडफेक प्रकरण

0
Innocent : दिवंगत माजी आमदार अनिल राठोडांसह शिवसैनिक निर्दोष; केडगाव हत्याकांड दगडफेक प्रकरण
Innocent : दिवंगत माजी आमदार अनिल राठोडांसह शिवसैनिक निर्दोष; केडगाव हत्याकांड दगडफेक प्रकरण

Innocent : नगर : अहिल्यानगरच्या केडगावमध्ये २०१८ मध्ये दोने शिवसैनिकांचा खून झाला होता. त्यानंतर झालेल्या दगडफेक आणि रस्ता रोको प्रकरणी शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह ६०० शिवसैनिकांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याचा निकाल आता लागला असून न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी अनिल राठोड यांच्यासह सर्वच शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता केली आहे.

हेही वाचा : ऐतिहासिक काशी बारव संरक्षित होणार; ‘शिवदुर्ग’च्या पाठपुराव्याला यश

नेमकं प्रकरण काय?

२०१८ साली केडगाव येथे शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ते वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडानंतर शिवसैनिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. हत्येच्या घटनेनंतर संतप्त जमावाने केलेली दगडफेक, रस्ता रोको, पोलिसांना शिवीगाळ, सरकारी कामात अडथळा आणणे आणि मृतदेहाची अवहेलना करणे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

नक्की पहा : भारत-पाकिस्तान सीमेवरील विद्युत रोषणाई

राठोड यांचे निधन (Innocent)

सुरुवातीला पोलिसांनी या गुन्ह्यात सर्व आरोपींवर ‘सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न’ केल्याप्रकरणी भादंवि कलम ३०८ लावले होते. मात्र, नंतरच्या तपासात पोलिसांनी हे गंभीर कलम वगळून इतर वाढीव कलमे लावली होती. पुढे २०२० मध्ये कोरोनाच्या लाटेत राठोड यांचे निधन झाले. न्यायालयात हा खटला सुरु होता. त्याचा निकाल आता आला असून सर्वांची निर्दोष सुटका झाली आहे.