Kopargaon : नगर : राष्ट्रीय संत सुरक्षा अभियानाच्या वतीने जैन साधू-संतांच्या सुरक्षेसह राष्ट्रीय संत सुरक्षा धोरण लागू करावे आदी मागण्यांसाठी कोपरगाव शहरात जैन समाज बांधवांसह महिलांनी काळ्याफिती लावून, मूक मोर्चा काढला. यावेळी तहसीलदार महेश सावंत यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. महावीर भवन येथून मोर्चास प्रारंभझाला. याप्रसंगी नगराध्यक्ष पराग संधान उपस्थित होते.
हेही वाचा : अवैध मावा- सुगंधी तंबाखू विक्री; चारजण पोलिसांच्या ताब्यात
नेमकी मागणी काय?
मध्य प्रदेशातील रिवा जिल्हा मुख्यालयात राष्ट्रसंत आचार्य श्री १०८ विद्यासागर महाराज यांच्या शिष्या आर्यिका श्री १०५ श्रुतमती माता व आर्यिका श्री १०५ उपशममती माता या विहाररत असताना दुर्दैवी अपघातात त्यांचे अकाली निधन झाले. या घटनेची विशेष तपास पथक (एसआयटी) अथवा न्यायालयीन चौकशी करावी, अशी मुख्य मागणी यावेळी करण्यात आली.
नक्की पहा : अहिल्यानगर एमआयडीसी परिसरात घाणीचे साम्राज्य; स्वच्छता अभियानाला हरताळ
समाजात चिंतेचे वातावरण (Kopargaon)
दुर्घटनेमुळे जैन समाजात तीव्र दुःखाची भावना व्यक्त होत आहे. जैन साधू-संत पूर्णतः अहिंसक, निःशस्त्र व पायी विहार करणारे तपस्वी आहेत. दुर्घटना व हल्ल्यांच्या घटनांमुळे समाजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संत सुरक्षा हा केवळ एका समाजाचा विषय नसून, तो भारताच्या अध्यात्मिक वारसा संरक्षणाचा प्रश्न आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.



