Parner News : पारनेर : शहरातून जात असलेल्या महामार्गाचे (Highway) काम संथ गतीने सुरू असून, त्यामुळे नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर, संबंधित विभागाने रस्त्याच्या कामाला गती देऊन पुढील दोन महिन्यांच्या आत हे काम पूर्ण करावे, अशी मागणी करणारे लेखी निवेदन पारनेर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (Republican Party of India) (आरपीआय) युवक तालुकाध्यक्ष प्रदीप संपतराव नगरे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना दिले आहे.
नक्की वाचा : पारनेर तालुक्यात बकरी ईद उत्साहात; ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण
अपघातांची मोठी शक्यता
पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात प्रदीप नगरे यांनी पारनेर शहरातील वाहतूक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. पारनेर शहरातील ग्रामीण रुग्णालय, सुपा रोड आणि पानोली चौक या दरम्यानच्या महामार्गाचे काम अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. पारनेर बस स्थानकापासून शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची याच मार्गावरून नेहमी वर्दळ असते. शाळा-कॉलेज भरताना आणि सुटताना या परिसरात प्रचंड गर्दी होत असते. जर शाळा सुरू असताना हे काम रेंगाळत राहिले, तर या भागात वाहतूक कोंडी होऊन अपघातांची मोठी शक्यता निर्माण होऊ शकते, अशी भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
बांधकाम विभागाला योग्य ते आदेश पारित करावे (Parner News)
सध्या शाळा व महाविद्यालयांना उन्हाळी सुट्ट्या आहेत. त्यामुळे रस्त्यावर विद्यार्थ्यांची वर्दळ कमी आहे. हीच योग्य वेळ साधून ग्रामीण रुग्णालय, सुपा रोड आणि पानोली चौक या भागातील रस्त्याच्या कामाला युद्धपातळीवर गती द्यावी. पुढील दोन महिन्यांच्या आत हे काम पूर्ण करण्यासंदर्भात आपल्या स्तरावरून सार्वजनिक बांधकाम विभागाला योग्य ते आदेश पारित करावेत, अशी आग्रही मागणी ‘आरपीआय’च्या वतीने करण्यात आली आहे.



