Pathardi Police Station : पाथर्डी : तालुक्यातील औरंगपूर (Aurangpur) येथील घटनेप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात माजी सैनिक (Ex-Servicemen) तथा उपसरपंच ईश्वर बापूसाहेब देशमुख यांना खोटेपणाने गोवण्यात आल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी माजी सैनिकांसाठी कार्यरत त्रिदल संघटनेचे तालुका अध्यक्ष गोवर्धन गर्जे यांनी केली आहे. आज (ता. २८) त्यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात पोलीस (Pathardi Police Station) निरीक्षक विलास पुजारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
नक्की वाचा : अवैध माती उपसा करणाऱ्यांची महसूल पथकाला अरेरावी; ६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
देशमुख यांना खोटेपणाने गोवण्यात आले
जिल्ह्यातील आजी-माजी सैनिकांनी पोलीस अधीक्षक मुम्माका सुदर्शन यांची भेट घेऊन या प्रकरणात विशेष लक्ष घालण्याची व एसआयटी स्थापन करण्याची मागणी करणार असल्याचे गर्जे यांनी सांगितले. गर्जे म्हणाले, २५ मे रोजी येथील एका महिलेने दाखल केलेल्या गुन्ह्यात देशसेवेत प्रामाणिक काम केलेले माजी सैनिक ईश्वर देशमुख यांना खोटेपणाने गोवण्यात आले आहे. हा माजी सैनिकावर अन्याय असून आम्ही तो सहन करणार नाही. सर्व माजी सैनिक अन्यायाविरोधात शेवटच्या श्वासापर्यंत कायदेशीर मार्गाने लढा देणार आहोत.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
निष्पक्ष चौकशीची मागणी (Pathardi Police Station)
पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन करून या प्रकरणातील सत्य बाहेर आणावे.दरम्यान, माजी सैनिक ईश्वर बापूसाहेब देशमुख यांनीही पोलीस निरीक्षकांकडे स्वतंत्र निवेदन देत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. संबंधित दोन व्यक्तींमध्ये जमिनीच्या वादातून न्यायालयीन प्रकरण सुरू असून त्यातून वैमनस्य निर्माण झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर गुन्ह्यात टाकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गंभीर आरोपांशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा करत या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
विनाकारण गुन्ह्यात नावे टाकण्यात आल्याचा आरोप
राजकीय हेतू आणि गावातील वैमनस्यातून दहा ते पंधरा जणांची नावे विनाकारण गुन्ह्यात टाकण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.गावातील वातावरण शांत राहावे, प्रकरणाला जातीय वळण लागू नये तसेच निरपराध युवकांच्या शिक्षण व नोकरीच्या संधींवर परिणाम होऊ नये, यासाठी पोलिसांनी निष्पक्ष तपास करावा, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर मानवाधिकार सहाय्यता असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रवीण रामनाथ सहाणे यांची स्वाक्षरी आहे.
योग्य कारवाईची मागणी
याशिवाय संघटनेने वामनभाऊ नगर येथील कार्यरत लेफ्टनंट कर्नल पिटर थोरात यांच्या घरातील चोरी, वसंत बबन वारे यांच्या अपघात प्रकरणातील दोषारोपपत्र, माजी सैनिक बाळासाहेब मिसाळ यांना दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी तसेच सैन्यदलात कार्यरत असलेल्या सारूक यांच्या मातोश्री कासूबाई सारूक यांच्या घरी मागील वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या चोरीच्या तक्रारींच्या तपासाबाबत पोलीस निरीक्षकांकडे निवेदने देत योग्य कारवाईची मागणी केली.



