Movement:अकोले: कांद्याला किमान 3000 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळावा, कमी दरात कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 1500 रुपये अनुदान द्यावे व हा निर्णय संपूर्ण राज्यभर लागू करावा, या मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने आज (ता.29) अकोले तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन (movement) करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात कांदे ओतून सरकारच्या धोरणांचा निषेध (Prohibition) केला. सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. राज्यभर बाजारात कांद्याला अत्यंत कमी दर मिळत आहेत. अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर उत्पादन खर्चापेक्षाही खाली गेले असून वाहतूक, मजुरी, साठवणूक आणि शेती खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरत नाही.
अवश्य वाचा- पारनेर शहरातील महामार्गाच्या कामाला गती द्या; पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
कांदा उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी (movement)
अवकाळी पाऊस, हवामानातील बदल आणि वाढते इनपुट खर्च यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना बाजारातील पडलेल्या दरांचा दुहेरी फटका बसत आहे. केंद्र सरकारकडून वेळोवेळी लादण्यात येणारी निर्यात बंदी, अपुरी साठवणूक व्यवस्था आणि बाजार हस्तक्षेपाचा अभाव यामुळे कांदा उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. अखिल भारतीय किसान सभेचे महाराष्ट्र राज्य सचिव डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
यामध्ये किसान सभेचे सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, राजाराम गंभीरे, तुळशीराम कातोरे, ज्ञानेश्वर काकड, संगीता साळवे, हेमलता शेळके, दत्ता गोंदके, बाळासाहेब भोर, अजित चौधरी, दत्ता कोंडार , योगेश भरितकर, बाळासाहेब मधे, आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.



