Maratha Reservation : सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला; चर्चेनंतर विखे काय म्हणाले?  

जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार सुरू

0
Maratha Reservation : सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला; चर्चेनंतर विखे काय म्हणाले? 
Maratha Reservation : सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला; चर्चेनंतर विखे काय म्हणाले? 

Maratha Reservation : नगर : मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी सातत्याने करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला आहे. ३० मे पासून ते उपोषण सुरू करणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला असून, सरकारच्या शिष्टमंडळाने आंतरवाली सराटीमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. या शिष्टमंडळामध्ये राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि प्रसाद लाड यांचा समावेश आहे. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारने मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत जे जे काही निर्णय घेतले त्यांची माहिती मनोज जरांगे पाटील यांना दिली आहे.

नक्की वाचा : महामार्गावरील दिशादर्शक फलकांवरील जुनी नावे बदला; सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन

हैदराबाद गॅझटचं प्रकरण सध्या कोर्टात प्रलंबित

प्रमाणपत्र वाटपाबाबत एसओपी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात प्रमाणपत्र देण्याबाबत सुलभता येईल. कुणबी प्रमाणत्रपत्र देण्याची कार्यवाही सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे प्रमाणपत्र देण्यास विलंब झाला. अधिकाऱ्यांवर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. जनजागृतीसाठी गावपातळीवर समिती गठीत करण्यात आली आहे. हैदराबाद गॅझेटमध्ये नोंदी नाहीत, पण आकडे आहेत. हैदराबाद गॅझटचं प्रकरण सध्या कोर्टात प्रलंबित आहे, अशी माहिती यावेळी विखे पाटील यांनी दिली आहे. मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. याबाबत देखील  विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांना माहिती दिली. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार सुरू (Maratha Reservation)

आंदोलनातील 668 गुन्ह्यांपैकी 567 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. 191 गुन्हे हे कोर्टात प्रलबिंत आहेत. या गुन्ह्यांसंदर्भात काय करता येईल याचा देखील विचार सुरू आहे, असंही यावेळी विखे पाटील यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार सुरू आहे, अशी माहिती देखील यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी बोलताना दिली आहे. मटार आता शिष्टमंडळाच्या भेटीनंतर यावर मनोज जरांगे पाटील नेमका काय निर्णय घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.