Rahuri News : राहुरी : अनुसूचित जाती अ.ब.क.ड उपवर्गीकरण तात्काळ लागू करण्यात यावे, तसेच वंचित समाजघटकांना न्याय मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी मातंग समाज आक्रमक झाला असून राहुरी तहसील कार्यालयावर (Rahuri Tehsil Office) निवेदन देत शासनाचे लक्ष वेधले आहे. मातंग समाज एकीकरण समिती, राहुरी तालुका (Rahuri Taluka) यांच्या वतीने तहसीलदार तथा दंडाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नक्की वाचा : आमदार कर्डीले ते तनपुरेंचा भाजप प्रवेश ! पडद्यामागचे सूत्रधार सुजय विखे पाटील
अनुसूचित जाती प्रवर्गात ५९ जातींचा समावेश
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील अनुसूचित जाती प्रवर्गात ५९ जातींचा समावेश असून १३ टक्के आरक्षणाची तरतूद आहे. मात्र मागील अनेक दशकांपासून या आरक्षणाचा बहुतांश लाभ काही मोजक्याच सशक्त जातींना मिळत आहे. त्यामुळे मातंग, वाल्मिकी, गारुडी, डक्कलवार यांसारख्या वंचित जाती मुख्य प्रवाहापासून दूर राहत असून त्यांना शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात अपेक्षित संधी मिळत नाहीत.मातंग समाज हा ऐतिहासिकदृष्ट्या अन्यायग्रस्त समाज असून सन १८७१ च्या गुन्हेगार जमाती कायद्यामुळे या समाजाचे मोठ्या प्रमाणात सामाजिक व आर्थिक शोषण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या समाजाला प्राधान्यक्रमाने स्वतंत्र न्याय मिळण्यासाठी अनुसूचित जाती अ.ब.क.ड उपवर्गीकरण तातडीने लागू करावे, अशी मागणी करण्यात आली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित (Rahuri News)
तसेच सोशल मीडियावर वीर लहुजी वस्ताद साळवे तथा साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल आक्षेपार्ह व बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.जोपर्यंत अनुसूचित जाती उपवर्गीकरण लागू होत नाही, तोपर्यंत राज्य शासनाने कोणतीही मेगा भरती करू नये, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. यावेळी मातंग समाज एकीकरण समितीचे नाम साठे, नगरसेवक सोन्याबापु जगधने, सामाजिक कार्यकर्ते निलेश जगधने, कांतीलाल जगधने, नंदू शिंदे, रवींद्र शेलार, ज्ञानेश्वर जगधने, संतोष बोरुडे, विजय बोरुडे, रवी वैरागर, सचिन घोरपडे, विजय सरोदे, सागर उंडारे, नामदेव जगधने, प्रशांत जगधने, नितीन मोरे, सोमा जगधने, मुकेश जगधने, सचिन शिंदे, सचिन नन्नवरे, काकासाहेब आढागळे, संदीप कोळसे, आरणे, विलास कोरडे, सुनील बोरुडे, श्याम नन्नवरे, काळू ननवरे, गणपत वायदंडे, आदींसह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



