No-Confidence Motion : अकोलेच्या नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव 

0
No-Confidence Motion : अकोलेच्या नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव 
No-Confidence Motion : अकोलेच्या नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव 

No-Confidence Motion : अकोले : भाजपची सत्ता असलेल्या अकोले नगरपंचायतीत माजी आमदार वैभव पिचड समर्थक नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे व उपनगराध्यक्ष शरद नवले यांच्या विरोधात स्वपक्षाच्याच नगरसेवकांनी विरोधकांना हाताशी धरून अविश्वास ठराव दाखल केला आहे. अनेक दिवसांपासून सत्ताधारी भाजपच्या दोन गटांत धुसफूस चालू असून पिचड यांनी हे वादळ शमवण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला. यावेळी मात्र १२ नगरसेवकांनी बंडाचा झेंडा हाती घेत, तब्बल ४० लाखांच्या निधी गैरव्यवहाराचे गंभीर आरोप करत नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष यांच्या कारभारावर अविश्वास व्यक्त केला आहे.

हेही वाचा : आधी स्वतःच्या पक्षाकडे पाहा; संजय राऊतांवर विखेंचा पलटवार

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार  

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी या प्रकरणाची दखल घेत अंतिम व शेवटची सुनावणी नोटीस बजावली आहे. विधानपरिषद निवडणूक आचारसंहितेचा अडसर दूर झाल्यानंतर ही कारवाई अटळ असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांना मिळणाऱ्या राजकीय संरक्षणामुळे अनेक नगरसेवक नाराज होते. मात्र, गटनेता बदल केल्याशिवाय अविश्वास ठराव आणल्यास ‘व्हिप’ची टांगती तलवार असल्याने, भाजपच्याच काही नगरसेवकांनी विरोधी पाच नगरसेवकांना सोबत घेऊन आगपाखड केली आहे. माजी नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी यांच्या नेतृत्वाखाली १२ नगरसेवकांनी २० मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली. तक्रारदार नगरसेवकांनी वडजे आणि उपनगराध्यक्ष नवले यांच्यावर आरोप केले आहेत.

नक्की पहा : पाथर्डी शहरात दुचाकी आणि बसचा अपघात; वाहतूक विस्कळीत

अंतिम नोटीस (No-Confidence Motion)

जिल्हाधिकारी दालनात भाजप आघाडी गटनेता बदल नोंदणीवरून ६ मे रोजी सुनावणी झाली होती; मात्र गटनेते बाळासाहेब वडजे त्याला गैरहजर राहिले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आता सर्व १२ बंडखोर नगरसेवकांसह नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांना कागदपत्रांसह प्रत्यक्ष हजर राहण्याची अंतिम नोटीस बजावली आहे.