MLA Sangram Jagtap : वडझिरे येथील रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांची एटीएस मार्फत चौकशी करा : आमदार संग्राम जगताप

MLA Sangram Jagtap : वडझिरे येथील रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांची एटीएस मार्फत चौकशी करा : आमदार संग्राम जगताप

0
MLA Sangram Jagtap : वडझिरे येथील रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांची एटीएस मार्फत चौकशी करा : आमदार संग्राम जगताप
MLA Sangram Jagtap : वडझिरे येथील रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांची एटीएस मार्फत चौकशी करा : आमदार संग्राम जगताप

अवैध घुसखोरीच्या विरोधात जनआक्रोश; पारनेरमध्ये सकल हिंदू समाजाचा भव्य ‘रास्ता रोको’

MLA Sangram Jagtap : पारनेर : पारनेर तालुक्यातील वडझिरे व परिसरातील गावांमध्ये काही बांगलादेशी घुसखोर (Bangladeshi Infiltrators) व रोहिंग्यांनी अनधिकृतपणे वास्तव्य करून स्थानिक नागरिकांना त्रास देणे आणि जमिनी हडपण्याचे प्रकार सुरू केले असल्याचा आरोप करत आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. देवी भोयरे (DEVI BHOYARE) फाटा येथे स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आयोजित करण्यात आलेल्या रस्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी होऊन त्यांनी प्रशासनाला सज्जड इशारा दिला.

नक्की वाचा : वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अहिल्यानगर शहरातील विविध भागांतील वीजपुरवठा विस्कळीत

आमदार संग्राम जगताप यांनी मागणी केली की,

​”या भागातील कथित घुसखोरांची केवळ स्थानिक पातळीवर चौकशी न करता ती दहशतवाद विरोधी पथकामार्फत (ATS) करण्यात यावी. स्थानिक नागरिकांच्या जमिनी बळकावण्याच्या वाढत्या घटनांमुळे जनतेमध्ये असंतोष असून, प्रशासनाने यावर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा स्थानिक नागरिक स्वतःच या घुसखोरांचा बंदोबस्त करतील”, असा इशारा त्यांनी दिला. वडझिरे परिसरासह संपूर्ण पारनेर तालुक्यातून अशा अवैध घुसखोरांचा बीमोड करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर भविष्यात यापेक्षाही मोठे आंदोलन उभारले जाईल आणि प्रशासनाच्या परवानगीची वाट न पाहता कायदा हातात घेऊन नागरिक या घुसखोरांचा बंदोबस्त करतील, अशा शब्दांत त्यांनी आपला पवित्रा मांडला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट (MLA Sangram Jagtap)

अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वडझिरे आणि परिसरात वाढत्या अवैध घुसखोरीच्या मुद्द्यावरून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घुसखोरीच्या विरोधात आणि प्रशासनाला जागे करण्यासाठी सोमवारी १ जून २०२६ रोजी आमदार संग्राम जगताप व सागर बेग यांच्या नेतृत्वाखाली’सकल हिंदू समाजा’च्या वतीने पारनेर-बेल्ह-आळेफाटा रोडवरील देवीभोयरे फाटा येथे भव्य ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले.

MLA Sangram Jagtap : वडझिरे येथील रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांची एटीएस मार्फत चौकशी करा : आमदार संग्राम जगताप
MLA Sangram Jagtap : वडझिरे येथील रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांची एटीएस मार्फत चौकशी करा : आमदार संग्राम जगताप

​गेल्या काही दिवसांपासून परिसरात रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांची वाढती संख्या, तसेच बांगलादेशी जिहादी वृत्तीच्या वाढत्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गंभीर प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि प्रशासनावर दबाव निर्माण करण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते. आंदोलनादरम्यान ‘अवैध घुसखोरीच्या विरोधात सकल हिंदू समाज मैदानात’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

​या आंदोलनात सकल हिंदू समाजाचे शेकडो बांधव, महिला, युवक आणि युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हिंदुत्ववादी आमदार संग्रामभैय्या जगताप आणि धर्मरक्षक सागर बेग यांची विशेष उपस्थिती होती. आपल्या भाषणातून त्यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला की, जर तातडीने या घुसखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली गेली नाही, तर हे जनआंदोलन अधिक तीव्र केले जाईल.

​आंदोलकांकडून करण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये घुसखोरांचा शोध घेऊन त्यांना तातडीने बाहेर काढणे आणि परिसरातील असुरक्षिततेचे वातावरण दूर करणे, यांचा समावेश आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देवीभोयरे फाटा परिसरात तणावपूर्ण शांतता होती. आंदोलनाच्या अनुषंगाने कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून स्थानिक प्रशासनाने परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

​या आंदोलनाने प्रशासनाला आपल्या भूमिकेवर पुनर्विचार करण्यास भाग पाडले असून, स्थानिक नागरिकांमध्ये वाढत्या घुसखोरीबाबत असलेल्या भीती आणि असंतोषाची दखल आता सरकारला घ्यावीच लागणार आहे. या आंदोलनामुळे पारनेर-बेल्ह-आळेफाटा मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.

कायदा हातात घेण्यास भाग पाडू नका…

जर प्रशासनाने या घुसखोरांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली, तर भविष्यात यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल. इतकेच नव्हे, तर प्रशासनाच्या परवानगीची वाट न पाहता कायदा हातात घेऊन नागरिक स्वतः या घुसखोरांचा बंदोबस्त करतील, असा इशारा आंदोलनाच्या माध्यमातून आमदार संग्राम जगताप यांनी दिला.