Loan Waiver : नगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (2 जून) राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये शेतकरी कर्जमाफी योजनेला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. मात्र विधान परिषद निवडणुक आचारसंहिता सुरू असल्याने लगेच घोषणा होणार नाही. कर्जमाफी संदर्भात सहकार विभाग अटी व शर्ती संदर्भात परिपत्रक काढण्यात येणार आहे. या अटी व शर्तीनंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे.
हेही वाचा : कॉन्ट्रॅक्ट न मिळाल्याच्या रागातून एचआर हेडवर हल्ला
56 लाख शेतकऱ्यांना लाभ
शेतकरी कर्जमाफीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. 36 हजार 585 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. 65 लाखांहून अधिक कर्जखात्यांवरचे कर्ज माफ होणार आहे. कर्जमाफीला मंजुरी मिळाली आहे, पण आचारसंहितेमुळे घोषणा करण्यात आलेली नाही.
नक्की पहा : जूनच्या पहिल्याच दिवशी पाथर्डीत वादळी पावसाची हजेरी
प्रोत्साहन निधी (Loan Waiver)
गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर यासाठी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल मुख्यमंत्र्याकडे सादर केल्यानंतर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. दोन लाखापर्यंत कर्ज सरकार माफ करणार असून नियमित पिक कर्ज भरणाऱ्यांना 50 हजार रुपयांचा प्रोत्साहन निधी देखील दिला जाणार आहे.



