Jayant Patil : नगर : राहुरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजपात प्रवेश केला. राहुरीचे नगराध्यक्ष आणि आपल्या कार्यकर्त्यांसह तनपुरे यांनी भाजपात पक्षप्रवेश करत कमळ हाती घेतले. प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांचे भाचे आहेत.
हेही वाचा : दुचाकी दुरुस्तीचा वाद; ग्राहकासह सासऱ्याला मारहाण
शेवटचं बोलणं कधी?
तनपुरेंच्या पक्षप्रवेशानंतर जयंत पाटील यांच्यासंदर्भात विचारले असता, माझं गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्याशी बोलणं झालं नाही माझं शेवटचं राजकीय बोलणं हे राहुरी पोटनिवडणुकीच्या वेळेसच झालं असावं. पण, राजकीय विषयावर त्यानंतर मी काही चर्चा केली नाही, असे प्राजक्त यांनी सांगितले होते. त्यानंतर आज (ता. ०३) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशावर भाष्य केलं असून आमचं बोलणं झालं असतं तर त्यांचा भाजपमधील प्रवेश टळला असता असंही जयंत पाटलांनी म्हटलंय.
नक्की पहा : बोल्हेगाव परिसरात दोन गटात राडा; तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पाटील म्हणाले… (Jayant Patil)
जयंत पाटील म्हणाले माझं काहीही बोलणं झालं नाही. त्यांनी प्रवेश केला त्यांनी त्यांचा विचार करून पक्षप्रवेश केला असेल. त्यांचा जिल्हा वेगळा आहे. त्यांचा अधिकार आहे, ते आमदार राहिले आहेत. मंत्री राहिले आहेत. त्यामुळे मी त्यांच्याविषयी काय बोलावं, त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल माझं काही बोलणं झालं नव्हतं असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.



