Shivdurg Trekkers : शिलालेख अभ्यासक अनिल दुधाणे यांचा अहिल्यानगर दौरा; श्रीगोंदा, कर्जत तालुक्यातील दुर्मिळ शिलालेखांचा शोध

Shivdurg Trekkers : शिलालेख अभ्यासक अनिल दुधाणे यांचा अहिल्यानगर दौरा; श्रीगोंदा, कर्जत तालुक्यातील दुर्मिळ शिलालेखांचा शोध

0
Shivdurg Trekkers : शिलालेख अभ्यासक अनिल दुधाणे यांचा अहिल्यानगर दौरा; श्रीगोंदा, कर्जत तालुक्यातील दुर्मिळ शिलालेखांचा शोध;
Shivdurg Trekkers : शिलालेख अभ्यासक अनिल दुधाणे यांचा अहिल्यानगर दौरा; श्रीगोंदा, कर्जत तालुक्यातील दुर्मिळ शिलालेखांचा शोध;

Shivdurg Trekkers : नगर : शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संचलित शिवदुर्ग वारसा संवर्धन समितीच्या माध्यमातून गावोगावी अडगळीत पडलेल्या छोट्या वारसा स्मरकांना पुन्हा नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात शिलालेख वाचण्याचा ध्यास घेतलेले पुणे येथील शिलालेख वाचक व इतिहास संशोधक अनिल दुधाणे यांचा दोन दिवसीय दौरा आयोजित केलेला होता. यामध्ये कर्जत, श्रीगोंदा तालुक्यातील गावोगावी असणाऱ्या शिलालेखांचे, फोटो, ठसे व छाप घेण्यात आले. लवकरच ऐतिहासिक संदर्भसहित या शिलालखांवरील, तत्कालीन इतिहासाचे, माहितीचे वाचन प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

हेही वाचा : ऐतिहासिक काशी बारव संरक्षित होणार; ‘शिवदुर्ग’च्या पाठपुराव्याला यश

वारसा संवर्धनाचा जागर

मंदिरे, बारवा, समाधी, गधेगळ, वृंदावन, यांच्यावर असणारे शिलालेखांचे अनिल दुधाणे यांच्या माध्यमातून वाचन करण्यात येणार आहेत. गावोगावी दुर्लक्षित असणारा वारसा संवर्धनाचा जागर सुरु आहे. दुर्लक्षित वारसा स्थळांवर असणारे शिलालेख हा इतिहासाचा अस्सल पुरावा मानला जातो. इतिहासाचे,भारतीय संस्कृतीचे दर्शन या वारसा स्थळावरील शिलालेखांवरून दिसून येते. गावाची शान, गावाचा अभिमान,पूर्वजांचा इतिहास आहे. म्हणूनच हा अडगळीत पडलेला परंतु अत्यंत महत्त्वाचा वारसा नव्याने वाचन करून गावच्या व समाजाच्या नजरे समोर मांडण्याचा व जतन संवर्धन करण्याचा प्रयत्न शिवदुर्ग वारसा संवर्धन समिती करीत आहे.

नक्की पहा : बोल्हेगाव परिसरात दोन गटात राडा; तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वारसा संवर्धनासाठी तरुणाई उत्सुक (Shivdurg Trekkers)

इतिहासाच्या पानांत कुठेही नसलेला इतिहास नव्याने उजेडात येईल, अशी आशा गावोगावच्या इतिहासप्रेमी तरुणांना आहे. हा वारसा संवर्धन करण्यासाठी तरुणाई उत्सुक आहे. शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेश इंगळे यांनी या अभ्यास दौऱ्याचे नियोजन केले होते. दिगंबर भुजबळ, सचिन भोसले, अमोल बडे, गणेश कुदांडे, मारुती वागसकर, प्रा.कानीफनाथ उगले, किरण शिंदे, नितीन वाबळे, शंकर जंबे, राजेश सांगळे, शुभम वाबळे, वेताळ सर, यांचे या कामी सहकार्य लाभले.