Murder Case : टिकाव डोक्यात घालून मुलाने केला बापाचा खून; श्रीरामपूर तालुक्यात घडली घटना

खूनाचे कारण अद्याप अस्पष्ट

0
Murder Case : टिकाव डोक्यात घालून मुलाने केला बापाचा खून; श्रीरामपूर तालुक्यात घडली घटना
Murder Case : टिकाव डोक्यात घालून मुलाने केला बापाचा खून; श्रीरामपूर तालुक्यात घडली घटना

Murder Case : नगर : श्रीरामपूर तालुक्यातील बाभळेश्वर रस्त्यावर असलेल्या खंडाळा गावात शेतकरी सचिन प्रभाकर ढोकचोळे (वय ५५) यांचा डोक्यात टिकाव घालून खून केल्याची घटना समोर आली आहे. हा खून (Murder Case) त्यांचाच मुलाने केला असून प्रणव सचिन ढोकचोळे, (वय २५) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. ही घटना आज (ता. ३) पहाटे घडली. याबाबत श्रीरामपूर पोलीस ठाण्यात (Shrirampur Police Station) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नक्की वाचा : दुचाकी दुरुस्तीचा वाद; ग्राहकासह सासऱ्याला मारहाण

गुन्हा दाखल

घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितिन देशमुख तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी प्रणव ढोकचोळेला तातडीने तपास करत ताब्यात घेतले असून पंचनामा व गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

खूनाचे कारण अद्याप अस्पष्ट (Murder Case)

दरम्यान संशयित आरोपी प्रणवन ढोकचोळे याने वडिलांचा खून घरगुती कारणातून केला का? अन्य काही कारण? याचा शोध श्रीरामपूर पोलीस घेत आहेत.