Gold jewelry stolen : वृद्ध महिलेची फसवणूक करत सोन्याचे दागिने लंपास; आरोपी कोतवाली पोलिसांच्या जाळ्यात

उपचारासाठी आलेले पैसे मिळणार आहेत असे सांगून बसवले दुचाकीवर

0
Gold jewelry stolen : वृद्ध महिलेची फसवणूक करत सोन्याचे दागिने लंपास; आरोपी कोतवाली पोलिसांच्या जाळ्यात
Gold jewelry stolen : वृद्ध महिलेची फसवणूक करत सोन्याचे दागिने लंपास; आरोपी कोतवाली पोलिसांच्या जाळ्यात

Gold jewelry stolen : नगर : वृद्ध महिलेची फसवणूक (Fraud) करून तिच्या कानातील व गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास (Gold jewelry stolen) करणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांच्या (Kotwali Police) गुन्हे शोध पथकाने अवघ्या काही दिवसांत शोधून अटक केली असून त्याच्याकडून चोरीस गेलेला सोन्याचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

नक्की वााचा : अतिक्रमणाच्या तक्रारीनंतर कारवर दगडफेक; सावेडीतील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

उपचारासाठी आलेले पैसे मिळणार आहेत असे सांगून बसवले दुचाकीवर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ता. ५ जून रोजी द्रौपदाबाई धोडीराम घोलप (रा. भातोडी पारगाव, ता. जि. अहिल्यानगर) या धान्य खरेदीसाठी मार्केट यार्ड परिसरात आल्या होत्या. त्या रिक्षाची वाट पाहत असताना एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या जवळ आला. त्याने, “तुमच्या मुलाने बोलावले आहे. तुमच्या डोळ्यांच्या उपचारासाठी आलेले पैसे मिळणार आहेत,” असे सांगून त्यांना दुचाकीवर बसवले व त्यांना मार्केट यार्ड परिसरातील हमाल पंचायत कार्यालयासमोर नेले आणि “गळ्यातील पानपोत व कानातील फुले काढून द्या, त्याशिवाय पैसे मिळणार नाहीत,” असे सांगितले. त्यानंतर त्याने महिलेचे सोन्याचे दागिने घेऊन तेथून पलायन केले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी (Gold jewelry stolen)

या प्रकरणी द्रौपदाबाई घोलप यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.या गुन्ह्याची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास सुरू असताना कोतवाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी मार्केट यार्ड परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच तांत्रिक विश्लेषण करून आरोपीची ओळख निश्चित केली.तपासादरम्यान ज्ञानदेव हरीभाऊ चेडे (रा. पारनेर, ता. जि. अहिल्यानगर, सध्या रा. सारसनगर, ता. जि. अहिल्यानगर) याला गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून फसवणुकीद्वारे मिळवलेला सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला.

यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस विक्रम वाघमारे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबमे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाटील, पोलीस अमलदार विक्रम वाघमारे, सुर्यकांत डाके, बाळकृष्ण दौंड, राहुल शिंदे, विनोद बोरगे, साबीर शेख, रोहिणी दरंदले, विशाल दळवी, दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे, अतुल काजळे, अमोल गाडे, दिपक रोहकले, सुरज कदम, सत्यम शिंदे, रमेश शिंदे, अतुल लाटे, सचिन लोळगे, संकेत धिवर, पल्लवी रोहकले आणि राहुल गुंड यांच्या पथकाने केले आहे.