Gram Panchayat Reservation Draw : पाथर्डी तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीसाठी ‘प्रभारी अधिकाऱ्यांच्या’ नेमणुका

महिलांसाठी सदस्य पदांची आरक्षण सोडत चिठ्ठी टाकून काढली जाणार

0
Gram Panchayat Reservation Draw : पाथर्डी तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीसाठी 'प्रभारी अधिकाऱ्यांच्या' नेमणुका
Gram Panchayat Reservation Draw : पाथर्डी तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीसाठी 'प्रभारी अधिकाऱ्यांच्या' नेमणुका

Gram Panchayat Reservation Draw : पाथर्डी : तालुक्यातील २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या, सन २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापन झालेल्या एकूण ८३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर, आरक्षण सोडतीची (Gram Panchayat Reservation Draw) प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी पाथर्डीचे तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यांनी तालुक्यातील २१ विस्तार अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व उप कृषी अधिकाऱ्यांची अध्यासी अधिकारी (प्रभारी अधिकारी) (Presiding Officer) म्हणून अधिकृत नेमणूक केली आहे. या सर्व नियुक्त अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक तहसील कार्यालयात (Tehsil Office) पार पडली असून प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. 

नक्की वाचा : वृद्ध महिलेची फसवणूक करत सोन्याचे दागिने लंपास; आरोपी कोतवाली पोलिसांच्या जाळ्यात

आरक्षण सोडत चिठ्ठी टाकून काढली जाणार

तालुक्यातील ८१ मुदत संपलेल्या आणि २ नवनिर्मित अशा एकूण ८३ ग्रामपंचायतींसाठी येत्या ११ व १२ जून रोजी विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रामसभांमध्ये तहसीलदार डॉ. नाईक यांनी प्राधिकृत केलेले हे अध्यासी अधिकारी अध्यक्ष म्हणून कामकाज पाहणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, ११ आणि १२ जून रोजी दोन सत्रांत (सकाळी १० वाजता आणि दुपारी २ वाजता) नियुक्त अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा घेतल्या जातील. यामध्ये अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (OBC) आणि सर्वसाधारण प्रवर्ग यासह सर्व प्रवर्गांतील महिलांसाठी सदस्य पदांची आरक्षण सोडत चिठ्ठी टाकून काढली जाणार आहे. निवासी नायब तहसीलदार किशोर सानप हे या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत सहकार्य करीत आहेत. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

आरक्षणातील गावे, तारीख व वेळ पुढील प्रमाणे (Gram Panchayat Reservation Draw)

११ जून सकाळी १० वाजता:- भारजवाडी, पिंपळगव्हाण, कामत शिंगवे, टाकळी मानूर, निपाणी जळगाव, शेकटे, सातवड, येळी, शिंगवे केशव, पारेवाडी, मिरी, कोपरे, माळीबाभुळगाव, कळसपिंप्री, सोमठाणे नलावडे, ढाकणवाडी, शिरसाठवाडी, मढी, पिरेवाडी, जाटदेवळे, चितळवाडी.

दुपारी २ वाजता: गावे:- जवळवाडी, अकोला, कडगाव, तिनखडी, भिलवडे, पागोरी पिंपळगाव, देवराई, खेर्डे, शंकरवाडी, राघोहिवरे, लोहसर, मांडवे, रांजणी, दुलेचांदगाव, चितळी, जोगेवाडी, चिंचपूर इजदे, मोहटे, आल्हणवाडी, पत्र्याचा तांडा, कोकीसपीर तांडा.  

१२ जून :सकाळी १० वाजता: गावे:- एकनाथवाडी, करोडी, आगसखांड, अंबिकानगर, केळवंडी, खांडगाव, शिरापूर, धामणगाव, कासार पिंपळगाव, मोहोज खुर्द, धनगरवाडी, मोहज देवढे, खरवंडी, जवखेडे दुमाला, औरंगपूर, भोसे, लांडकवाडी, सुसरे, चिंचपूर पांगुळ, माणिकदौंडी, कारेगाव.

दुपारी २ वाजता: गावे:- मुंगूसवाडे, मिडसांगवी, जांभळी, पिंपळगाव टप्पा, वाळुंज, सोमठाणे खुर्द, कौडगाव, घाटशिरस, आडगाव, मोहोज बुद्रुक, बोरसेवाडी, चुंभळी, नांदूर निंबादैत्य, शिराळ, सांगवी बुद्रुक, हनुमान टाकळी, तोंडोळी, मालेवाडी, घुमटवाडी, भुतेटाकळी या आरक्षण सोडतीमध्ये या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.