Akole : विश्रामगड येथे शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

0
Akole : विश्रामगड येथे शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात
Akole : विश्रामगड येथे शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

Akole : अकोले : तालुक्यातील किल्ले विश्रामगड येथे शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत भक्तिभाव, शिस्त आणि उत्साहात साजरा करण्यात आला. सिन्नर येथील रौद्र प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित केलेला हा पहिल्या वर्षाचा सोहळा शिवप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरला.

हेही वाचा : अतिक्रमणाच्या तक्रारीनंतर कारवर दगडफेक; सावेडीतील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

दिव्यांग शिवप्रेमी

या सोहळ्यासाठी संगमनेर येथून 12 शिलेदारांनी विशेष सहभाग नोंदवला. या शिलेदारांमध्ये शिवव्याख्याते दीपक कर्पे, डॉ. महादेव अरगडे, संतोष शेळके, सुखदेव इल्हे, सुभाष घनदाट, पी. डी.सोनवणे आदी शिवप्रेमींचा सहभाग होता. गडावर पारंपरिक वाद्यांच्या साथीने शिवभक्त, कलाकार, भजनी मंडळ यांनी सादर केलेली शिवभक्तीपर गीते उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. या कार्यक्रमात एक विशेष भावनिक क्षण पाहायला मिळाला, जेव्हा एका दिव्यांग शिवप्रेमीने छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित अत्यंत सुंदर व मन हेलावून टाकणारे गाणे सादर केले. त्याच्या सादरीकरणाने संपूर्ण गड परिसर स्तब्ध झाला आणि उपस्थितांच्या डोळ्यांत अभिमान व भावनांचे अश्रू दाटून आले.

नक्की पहा : दत्तात्रय पानसरे यांनी माघार घेऊन काय मिळविले?

जय शिवरायच्या घोषणा (Akole)

छत्रपती शिवाजी महाराज हरवलेत का? या विषयावर प्रभावी नाट्यही सादर झाले. या नाटिकेमधून आजच्या तरुण पिढीसमोर इतिहासाची जाणीव करून देत शिवचरित्राचे वास्तव आणि प्रेरणादायी पैलू अत्यंत ठळकपणे मांडण्यात आले. शिवव्याख्याते दीपक कर्पे यांनी विश्रामगडाचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य तसेच शिदोजी निंबाळकर यांचे बलिदान यावर सखोल व प्रभावी मार्गदर्शन केले. गड परिसरात दिवसभर जय शिवरायच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते.