Akole : अकोले : तालुक्यातील लिंगदेव येथील श्री क्षेत्र लिंगेश्वर देवस्थान येथे अधिक मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज शिवलीलामृत पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार (ता.9) ते शुक्रवार (ता.12) या कालावधीत होणार्या या धार्मिक सोहळ्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
हेही वाचा : अतिक्रमणाच्या तक्रारीनंतर कारवर दगडफेक; सावेडीतील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
विविध धार्मिक कार्यक्रम
सप्ताह काळात पहाटे 5 ते 6 यावेळेत श्री लिंगेश्वरांचा रुद्राभिषेक, सकाळी 7.30 ते 11 यावेळेत ग्रंथराज शिवलीलामृत पारायण व विष्णूसहस्रनाम स्तोत्र पठण, दुपारी भजन सेवा, गाथा भजन, सायंकाळी प्रवचन व हरिपाठ तसेच रात्री कीर्तन आणि जागर सेवा असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी विवेक महाराज केदार, दुसर्या दिवशी शिवानंद महाराज पाटील, तिसर्या दिवशी एकनाथ महाराज चत्तर यांचे कीर्तन होणार आहे.
नक्की पहा : दत्तात्रय पानसरे यांनी माघार घेऊन काय मिळविले?
भाविकांना आवाहन (Akole)
सप्ताहाच्या समारोपप्रसंगी अनंत महाराज काळे यांचे काल्याचे कीर्तन होणार असून सप्ताहाची भक्तिमय सांगता होणार आहे. या सप्ताहात तालुक्यातील दिग्गज मृदुंगाचार्य व गायनाचार्य यांची सेवा लाभणार आहे. तरी अधिक मासातील या पवित्र पर्वात अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज शिवलीलामृत पारायण, प्रवचन, कीर्तन, पालखी सोहळा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी तालुक्यासह पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.



