Doordarshan : नगर : श्री गुरुमाऊली संगीत विद्यालयाच्या संचालिका वर्षा पंडित आणि चंद्रकांत पंडित यांची कन्या नताशा चंद्रकांत पंडित (Natasha Chandrakant Pandit) हिची मुंबई दूरदर्शनची (Doordarshan) बी-हाय ग्रेड कलाकार म्हणून नुकतीच निवड झाली आहे. मुंबई दूरदर्शनने जाहीर केलेल्या मान्यताप्राप्त कलाकारांमधे नताशा हिची भरतनाट्यम नृत्य कलावंत (Bharatanatyam Dancer) म्हणून निवड करण्यात आली.

चेन्नई दूरदर्शनवर नृत्यकलेचे सादरीकरण
चेन्नई दूरदर्शनची ती मान्यताप्राप्त कलाकार असून चेन्नई दूरदर्शनवर तिने नृत्यकलेचे सादरीकरण देखील केले आहे. नताशा हिने आपली आई वर्षा पंडित यांचे कडून प्रेरणा घेऊन आपली कला जोपासली व पुढे वृद्धिंगत केली. भरतनाट्यमच्या गांधर्वच्या परिक्षांमधे उत्तम गुण प्राप्त करत ती विशारद उत्तीर्ण झाल्यानंतर चेन्नई येथील कलाक्षेत्र फाऊंडेशन या नामांकित संस्थेमधून नृत्याचे पुढील शिक्षण घेतले. त्यानंतर चेन्नईतील सहृदय फाऊंडेशनचे श्री शिजीत कृष्ण यांचेकडे भरतनाट्यमचे अँडव्हान्स शिक्षण घेतले. तसेच भरतनाट्यम मध्येच एम ए पदवीही प्राप्त केली. सध्या ती नृत्य साधकांना नृत्यकलेचे शिक्षण देत आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
निवडीबद्दल सर्वत्र होत आहे अभिनंदन (Doordarshan)
नताशा एक उत्तम शास्त्रीय नृत्यांगना तर आहेच पण त्याबरोबरच इतरही अनेक उत्तमोत्तम कला व कौशल्ये तिच्याकडे आहेत. इतक्या व्यस्ततेतूनही चित्र काढणे, कविता करणे, फोटोग्राफी या सारखे छंदही ती जोपासत असते. दूरदर्शनच्या या निवडीबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे



