Firing : श्रीरामपूरमध्ये शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यावर गोळीबार!

Firing : श्रीरामपूरमध्ये शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यावर गोळीबार!

0
Firing : श्रीरामपूरमध्ये शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यावर गोळीबार!
Firing : श्रीरामपूरमध्ये शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यावर गोळीबार!

Firing : नगर : श्रीरामपूर शहरातून थरारक घटना समोर आली आहे. गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) (Shiv Sena (Eknath Shinde)) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी थेट गोळीबार (Firing) केल्याची घटना समोर आली आहे. भररस्त्यात चालत्या वाहनावर झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामुळे (Deadly Attack) श्रीरामपूर परिसर खळबळ उडाली आहे.

नक्की वाचा : पाथर्डी तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीसाठी ‘प्रभारी अधिकाऱ्यांच्या’ नेमणुका

हल्लेखोरांचा नेम चुकल्याने मोठी दुर्घटना टळली

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना सोमवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास घडली. शिवसेना नेते प्रशांत कहाणे हे त्यांच्या चारचाकी वाहनातून जात होते. त्याचवेळी गोंधवणी परिसरात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी वाहनाच्या दिशेने थेट गोळीबार केला. प्रशांत कहाणे यांना संपवण्याच्या उद्देशानेच हा गोळीबार केला होता. मात्र, सुदैवाने हल्लेखोरांचा नेम चुकल्याने एक मोठी दुर्घटना टळली. प्रशांत कहाणे या जीवघेण्या हल्ल्यातून थोडक्यात आणि सुखरूप बचावले आहेत.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

अज्ञात हल्लेखोरांसह त्यांच्या दुचाकीचा शोध सुरु (Firing)

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, गोळीबार करून पळून गेलेल्या अज्ञात हल्लेखोरांसह त्यांच्या दुचाकीचा शोध घेत आहे.