Manuscripts : नगर : जिल्ह्यातील सर्व नागरिक तसेच ग्रंथालयांनी ज्ञानभारतम ॲपवर सन १९५० पूर्वीची हस्तलिखिते, पोथ्या, पुराणे तसेच योग, आरोग्य, अंकगणित, विज्ञान, खगोलशास्त्र आदी विषयांवरील साहित्याची नोंद दि. १५ जून २०२६ पर्यंत अपलोड करण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांनी केले आहे.
हेही वाचा : धनादेश अनादर प्रकरणांसाठी १८ जुलै रोजी विशेष लोकअदालत
कशी आहे प्रकिया?
या उपक्रमांतर्गत सध्या हस्तलिखितांची संख्या, भाषा, लिपी तसेच साहित्याची स्थिती याबाबतची प्राथमिक माहिती नोंदवावयाची असून संबंधित साहित्याच्या आतील पृष्ठांची दोन ते तीन छायाचित्रेही अपलोड करावयाची आहेत. माहिती भरताना गुगल लोकेशन सेवा सुरू ठेवणे आवश्यक असून त्यामुळे संबंधित साहित्य नेमके कुठे उपलब्ध आहे, याची नोंद करणे सुलभ होईल.
नक्की पहा : जगभरात स्कूल बस पिवळीच का?
साहित्याचे डिजिटायझेशन (Manuscripts)
ज्ञानभारतम ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध असून त्याद्वारे माहिती सहजपणे अपलोड करता येईल. संबंधित हस्तलिखितांवरील मालकी हक्क मूळ धारकांकडेच कायम राहणार असून केंद्र शासनाकडून केवळ त्या साहित्याचे डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. या प्रक्रियेचा संपूर्ण खर्च केंद्र शासनामार्फत करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या वैयक्तिक संग्रहातील तसेच ग्रंथालयांमधील साहित्याबरोबरच परिसरातील खासगी व्यक्ती, मंदिरे, मशिदी, महानुभाव आश्रम आदी ठिकाणी उपलब्ध हस्तलिखिते आणि प्राचीन साहित्य यांची ज्ञानभारतम ॲपवर नोंद करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.



