FDA : शिर्डीत भेसळयुक्त पेढ्यांची विक्री; FDA अधिकाऱ्यांकडून तपासणी

0
FDA : शिर्डीत भेसळयुक्त पेढ्यांची विक्री; FDA अधिकाऱ्यांकडून तपासणी
FDA : शिर्डीत भेसळयुक्त पेढ्यांची विक्री; FDA अधिकाऱ्यांकडून तपासणी

FDA : नगर : तुकाराम मुंडेंनी FDA ची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. त्यामुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. साईबाबांच्या शिर्डीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याशी प्रसादाच्या नावाखाली आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. प्रसादाच्या नावाखाली भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांची विक्री होत असल्याचे समोर आले. साईभक्तांनी बुरशीयुक्त पेढ्यांबाबत तक्रारी केल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन तातडीने खडबडून जागे झाले असून ॲक्शन मोडमध्ये आले आहे.

हेही वाचा : धनादेश अनादर प्रकरणांसाठी १८ जुलै रोजी विशेष लोकअदालत

अधिकारी दाखल

साईबाबांच्या शिर्डीत बोगस पेढा प्रसाद विक्री होत असल्याची घटना समोर येताच प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. शिर्डीतील अनेक दुकानांमध्ये अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले असून पेढे आणी इतर खाद्यपदार्थाचे नमुने घेण्यात आले आहेत. हे नमुने लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले जाणार असून दोषी आढळल्यास विक्रेते आणि उत्पादकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

नक्की पहा : सामान्यांना कर्ज मिळणं कठीण होणार? बँकांचा भर आता ‘प्रीमियम’ ग्राहकांवर…

राज्यात धडक मोहीम (FDA)

प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी धडक मोहीम राबवत तब्बल ८ कोटी ५७ लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त केला आहे. गुटखा, पानमसाला, भेसळयुक्त सुपारी, खाद्यतेल, गूळ, खवा आणि एनर्जी ड्रिंक यांसारख्या पदार्थांवर कारवाई करत ३३ जणांना अटक करण्यात आली आहे.