Clash over farm boundary dispute : शिराढोण शिवारात शेत बांधाच्या वादातून हाणामारी; दोघे जखमी, चार जणांवर गुन्हा दाखल

Clash over farm boundary dispute : शिराढोण शिवारात शेत बांधाच्या वादातून हाणामारी; दोघे जखमी, चार जणांवर गुन्हा दाखल

0

Clash over farm boundary dispute : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील शिराढोण शिवारात शेताच्या बांधाच्या वादातून झालेल्या मारहाणीत (Clash over farm boundary dispute) दोघे जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दत्तात्रय लिंबराज वाघ (वय ४५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात (Ahilyanagar Taluka Police Station) चार जणांविरूध्द गुन्हा दाखल (Case Registered) करण्यात आला आहे.

बांध आतमध्ये सरकवल्याचे सांगितल्याने वाद

किसन मारूती हिंगे, सागर किसन हिंगे, विशाल बाळासाहेब हिंगे व शरद मंजाबापु हिंगे (सर्व रा. शिराढोण) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. फिर्यादीचे मुले विजय वाघ व विशाल वाघ हे जखमी झाले आहेत. फिर्यादी दत्तात्रय वाघ हे आपल्या शेताची पाहणी करण्यासाठी गेले असता संशयित आरोपी तेथे उभे होते. यावेळी तुम्ही माझ्या शेताचा बांध आतमध्ये सरकवला आहे, असे फिर्यादींनी आरोपींना सांगितल्याने वाद निर्माण झाला. फिर्यादीनुसार, या बोलण्याचा राग आल्याने सागर हिंगे याने शिवीगाळ करत जवळ पडलेल्या लोखंडी खोऱ्याने फिर्यादीवर हल्ला केला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

लाकडी काठी व कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण (Clash over farm boundary dispute)

त्यानंतर विशाल हिंगे व शरद हिंगे यांनी लाकडी काठी व कुऱ्हाडीच्या दांड्याने फिर्यादीचा मुलगा विशाल वाघ व विजय वाघ यांना मारहाण करून जखमी केली. वाद सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या फिर्यादींच्या पत्नी संगीता वाघ यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली. तसेच बाहेरची पोरं बोलावून तुम्हाला तलवारीने मारून टाकू, अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.