
Crime filed : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर परिसरात अवैधरित्या मावा व सुगंधी तंबाखू बनवणाऱ्या ठिकाणी एमआयडीसी पोलीस (MIDC Police Station) व अन्न औषध प्रशासन (Food and Drug Administration) विभागाच्या वतीने छापा टाकून दोन लाख 69 हजार 250 रुपयांचा मध्यमाल हस्तगत केला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात एक संशयीत प्रशांत रामदास मगर याच्या विरोधात गुन्हा दाखल (Crime filed) करण्यात आला आहे.
नक्की वााचा : अतिक्रमणाच्या तक्रारीनंतर कारवर दगडफेक; सावेडीतील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
दोन लाख 69 हजारांचा मुद्देमाल हस्तगत
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळालेल्या माहितीनुसार जेऊर बायजाबाई येथील प्रशांत मगर हा त्याच्या राहत्या घरी लगत असलेल्या एका पत्राच्या शेडमध्ये सुगंधी तंबाखू व सुपारी यापासून मावा बनवत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत तब्बल दोन लाख 69 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
यांच्या पथकाने केली कारवाई (Crime filed)
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, अमलदार राजु सुद्रीक, आजिनाथ पालवे, किशोर जाधव, राहुल ढाकणे सह अन्न व औषध प्रशासन विभागाचे जी. व्ही. जगताप, साजिदा अब्दुल रशिद मुल्ला, सोपान इंगळे, किरण जगदाळे यांच्या पथकाने केली आहे.


