
Illegal Sand Transportation : नगर : कोपरगाव तालुक्यातील रवंदा परिसरात अवैध वाळू वाहतूक (Illegal Sand Transportation) करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) पहाटेच्या सुमारास कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत वाळू, डम्पर आणि दुचाकी असा एकूण १२ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
विक्रम बाजीराव आहेर (वय ३७), पंढरी म्हसु आहेर (वय ४६, दोघेही रा. मुखेड, ता. येवला, जि. नाशिक) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नावे आहेत.
नक्की वााचा : अतिक्रमणाच्या तक्रारीनंतर कारवर दगडफेक; सावेडीतील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार कारवाई
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार आणि पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात गस्त घालत होते. यावेळी पथकाला रवंदा-टाकळी मार्गावर एका डम्परमधून अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
नाशिकमधील दाेघे ताब्यात (Illegal Sand Transportation)
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित वाहनांना अडविले. यावेळी टाटा कंपनीचा डम्पर आणि त्याच्या मागे येणारी दुचाकी ताब्यात घेण्यात आली. चौकशीत आरोपींची नावे विक्रम बाजीराव आहेर (वय ३७) आणि पंढरी म्हसु आहेर (वय ४६, दोघेही रा. मुखेड, ता. येवला, जि. नाशिक) अशी असल्याचे समोर आले.
पोलिसांनी आरोपींकडून सुमारे दोन ब्रास वाळू (किंमत २० हजार रुपये), एक डम्पर १२ लाख रुपये आणि दुचाकी (किंमत ६० हजार रुपये) असा एकूण १२ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे तसेच पोलीस अंमलदार विजय पवार, बाळासाहेब गुंजाळ, सुनील मालणकर आणि प्रमोद जाधव यांच्या पथकाने केली.


