ACB : लाचखोर महसूल कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात; पण ‘मुख्य सुत्रधार’ अजूनही मोकळेच?

मूळ गुन्हेगाराला टाळून केवळ खालच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

0
ACB : लाचखोर महसूल कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात; पण 'मुख्य सुत्रधार' अजूनही मोकळेच?
ACB : लाचखोर महसूल कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात; पण 'मुख्य सुत्रधार' अजूनही मोकळेच?

ACB : नगर : राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाचा मोबदला मिळवून देण्यासाठी एका शेतकऱ्याकडे एक लाख २० हजारांची लाच (Bribery) मागितल्याप्रकरणी श्रीगोंदा-पारनेर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील तत्कालीन महसूल सहाय्यक मंगेश विजय ढुमणे आणि कंत्राटी कर्मचारी अमोल कानिफनाथ खामकर यांच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केलेली ही कारवाई अत्यंत स्वागतार्ह मानली जात असली, तरी या संपूर्ण प्रकरणामागील मुख्य सुत्रधार असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर अद्याप कारवाई का झाली नाही, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.

नक्की वाचा : दोन वर्षांपासून फरार असलेला अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी राहुरीतून जेरबंद

मूळ गुन्हेगाराला टाळून केवळ खालच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

लाचखोर महसूल सहाय्यक मंगेश ढुमणे याने शेतकऱ्याला व्हॉट्सॲप कॉल करून, “जर पैसे दिले तर एफ.टी.ओ. (फंड ट्रान्सफर ऑर्डर) लगेच हातात देतो. एफ.टी.ओ. जनरेट करण्यासाठी प्रांत साहेबांना पैसे द्यावे लागतील,” असे स्पष्टपणे सांगितले होते. यावरून हे स्पष्ट होते की, ढुमणे आणि खामकर यांना लाच मागण्यासाठी श्रीगोंदा-पारनेरचे प्रांत यांनीच प्रवृत्त केले होते. असे असतानाही, मूळ गुन्हेगाराला बगल देऊन केवळ खालच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने सखोल तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

मंगेश ढुमणेवर यापूर्वीही एसीबीचा ट्रॅप (ACB)

विशेष म्हणजे, लाचखोर महसूल सहाय्यक मंगेश ढुमणे याच्यावर झालेली ही पहिली कारवाई नाही. यापूर्वीही त्याच्यावर एसीबीचा ट्रॅप झालेला होता.
ती पहिली लाचेची केस अद्याप न्यायालयात प्रविष्ट (न्यायप्रविष्ट) असतानाच, त्याने पुन्हा एकदा थेट १ लाख २० हजार रुपयांची लाच मागण्याचे धाडस केले. एका गुन्ह्यात अडकलेला कर्मचारी इतक्या उघडपणे पुन्हा लाच मागतो, यावरूनच त्याला वरिष्ठ अधिकारी यांचे पूर्ण पाठबळ आणि अभय होते, हे सिद्ध होते.

नागरिकांमधून संतप्त सवाल

भूसंपादन हा शेतकऱ्याचा कायदेशीर हक्क आहे. स्वतःच्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्याला लाखो रुपयांची लाच द्यावी लागते, ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे. सोशल मीडियावरही आणि सामान्य नागरिक शेतकरी आता एकच प्रश्न उपस्थित केला जातं आहे.’हे पैसे अधिकाऱ्यांसाठी होते की स्वतःसाठी?’. कार्यालयीन कर्मचाऱ्यांना लाचेच्या खाईत ढकलणाऱ्या आणि स्वतः पडद्यामागून सूत्रे हलवणाऱ्या अशा भ्रष्ट अधिकाऱ्याचा डाव आता लपून राहिलेला नाही.