Explosion : नगर : जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील (LoC) उरी सेक्टरमध्ये मंगळवारी दुपारी एका स्फोटात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले आहेत. वीरमरण आलेले दोन्ही जवान महाराष्ट्राचे सुपुत्र होते, अशी माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे. अर्जुन जाधव आणि विक्रम बालकृष्ण चव्हाण अशी या शहीद जवानांची नावे आहेत.
हेही वाचा : लाचखोर महसूल कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात; पण ‘मुख्य सुत्रधार’ अजूनही मोकळेच?
उपचारापूर्वीच मृत घोषित
अर्जुन जाधव हे सातारा जिल्ह्यातील शहापूरचे आहेत. तर, विक्रम चव्हाण हे ऐरोली येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. श्रीनगरमधील लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनोज साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरपासून सुमारे १०० किमी उत्तरेस असलेल्या उरी सेक्टरमधील कमलकोट भागात हा स्फोट झाला. स्फोटात गंभीर जखमी झालेल्या दोन्ही जवानांना तातडीने श्रीनगर येथील लष्कराच्या ९२ बेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले.
नक्की पहा : कर्जत व मिरजगावमध्ये अवैध दारू विक्रेत्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा
स्फोटाचे कारण अस्पष्ट (Explosion)
हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याबाबत लष्कराकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली नसून तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे महाराष्ट्रावर आणि शहीद जवानांच्या गावांवर शोककळा पसरली आहे. अर्जुन जाधव हे सन २०१६-१७ मध्ये भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. दोन वर्षापूर्वी २०२४ मध्ये त्यांचा विवाह झाला होता. अर्जुन जाधव मागील काही वर्षांपासून ते जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी कर्तव्यावर होते. त्याआधी पुण्यात त्यांची पोस्टिंग होती. अर्जुन यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई-वडील, भाऊ, बहिणी असा परिवार आहे. त्यांचा लहान भाऊ ऋषी जाधव हे नौदलात आहेत.



