ACB : श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात

0
ACB : श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात
ACB : श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात

ACB : नगर : श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील दोन कर्मचारी आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सात हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहेत. याप्रकरणी तिसऱ्या कर्मचाऱ्याचीही चौकशी सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील दादा म्हस्के आणि नितीन गाडगे या कर्मचाऱ्यांना आज (ता. १८) दुपारी सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले. राजेश जाधव याचीही चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.

हेही वाचा : श्रीगोंद्यात थरार! ‘लिव्ह इन’मधील मैत्रिणीचा निर्घृण खून करून मृतदेह जाळला

एकाच वेळी तीन पोलिस जाळ्यात

या प्रकरणात अपघातातील एका गुन्ह्याची नोंद दाखल करण्यासाठी पोलिसांनी १० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यातील सात हजार रुपये स्वीकारताना हे कर्मचारी पकडले गेले. एकाच वेळी तीन पोलिस कर्मचारी लाच घेताना सापडण्याची ही श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या इतिहासातील पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

नक्की पहा : अहिल्यानगर शहरातील खून प्रकरणी चार आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

भष्टाचार वाढला (ACB)

मागील वर्षीही श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील दोन कर्मचारी लाच घेताना पकडले गेले होते. त्यानंतरही पोलिस ठाण्यात भ्रष्टाचाराचे प्रमाण किती आहे, याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. ही कारवाई श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी मानली जात आहे.