Monsoon : मान्सून सक्रिय? ‘या’ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा, तर ‘या’ ठिकाणी उष्णतेची लाट

0
Monsoon : मान्सून सक्रिय? ‘या’ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा, तर ‘या’ ठिकाणी उष्णतेची लाट
Monsoon : मान्सून सक्रिय? ‘या’ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा, तर ‘या’ ठिकाणी उष्णतेची लाट

Monsoon : नगर : एकीकडे मान्सून खोळंबला असतानाच सध्या देशात दोन वेगवेगळ्या प्रकारचं हवामान दिसून येत आहे. एकीकडे नैऋत्य मान्सून पूर्व आणि ईशान्य भारताच्या दिशेने वेगाने आगेकूच करत आहे. तर दुसरीकडे मध्य आणि दक्षिण भारतातील बहुतांश भागात भीषण उन्हाळा आणि लू चा प्रकोप दिसून येत आहे. यादरम्यान, भारतीय हवामान खात्याने मुसळधार पाऊस, वादळ आणि उष्णतेच्या लाटेबाबत अनेक राज्यांना इशारा दिला आहे.

हेही वाचा : श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात

इथे अनुकूल

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मान्सूनची उत्तर सीमा सध्या हरनाई, सोलापूर, हैदराबाद आणि रांची येथून जात आहे. येत्या चार पाच दिवसांमध्ये मान्सूनच्या तेलंगाणा, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या उर्वरित भागातून आगेकूच करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे.

नक्की पहा : अहिल्यानगर शहरातील खून प्रकरणी चार आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

उष्णतेची लाट (Monsoon)

ईशान्य भारतात २४ जूनपर्यंत मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा येथे मुसधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उपहिमालयीन क्षेत्र, पश्चिम बंगाल, सिक्किम, आसाम आणि मेघालयमध्ये कुठे कुठे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत गुजरात, तामिळनाडू आणि केरळच्या अनेक भागांत १२ ते २० सेंटीमीटरपर्यंत पर्जन्यवृष्टीची नोंद झाली आहे. दुसरीकडे विदर्भ आणि तेलंगाणामध्ये २० जूनपर्यंत भीषण उष्णतेच्या लाटेची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.