Police Action : नगर : श्रीगोंदा पोलिसांकडून विना नंबर प्लेट दुचाकींविरोधात राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत एकूण ९४,५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. चोरीच्या वाहनांचा शोध घेण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी श्रीगोंदा पोलीस स्टेशनने शहरात विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत विना नंबर प्लेट असलेल्या दुचाकींवर लक्ष केंद्रित करून ४९ वाहनांची तपासणी करण्यात आली. संशयास्पद वाहनांना थांबवून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. प्रत्येक वाहनाचे आर.सी. बुक, चेसी नंबर आणि इंजिन नंबरची सविस्तर तपासणी करण्यात आली.
हेही वाचा : मान्सून सक्रिय? ‘या’ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा, तर ‘या’ ठिकाणी उष्णतेची लाट
१६ वाहने जप्त
तपसणी दरम्यान ३४ वाहने कागदपत्रे पूर्ण असल्याने दंडात्मक कारवाई करत वाहन मालकांना सोडण्यात आले. १६ वाहने कागदपत्रे अपूर्ण किंवा संशयास्पद आढळल्याने ती पोलीस ठाण्यात जमा ठेवण्यात आली आहेत. यांची पुढील चौकशी सुरू आहे.
नक्की पहा : अहिल्यानगर शहरातील खून प्रकरणी चार आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
नागरिकांकडून स्वागत (Police Action)
श्रीगोंदा पोलीसांनी नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे की, “प्रत्येक वाहन मालकाने आपल्या दुचाकी किंवा चारचाकी वाहनाच्या पुढील आणि मागील बाजूस नियमानुसार नंबर प्लेट बसवून घ्यावी. नियमांचे पालन न केल्यास यापुढेही अशा प्रकारच्या विशेष मोहिमा राबवून कठोर कारवाई करण्यात येईल.” श्रीगोंद्यासारख्या तालुका ठिकाणी वाहन चोरीच्या घटना अधूनमधून घडत असतात. अशा पार्श्वभूमीवर पोलीसांनी घेतलेल्या या सक्रिय पवित्र्याचे स्थानिक नागरिकांकडून स्वागत होत आहे.



