Pratap Sarnaik : ‘एसटी’ च्या कर्मचाऱ्यांना 58 टक्के महागाई भत्ता; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

0
Pratap Sarnaik : ‘एसटी’ च्या कर्मचाऱ्यांना 58 टक्के महागाई भत्ता; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
Pratap Sarnaik : ‘एसटी’ च्या कर्मचाऱ्यांना 58 टक्के महागाई भत्ता; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Pratap Sarnaik : नगर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे ८६ हजार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रतापराव सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा गुरुवारी केली. यासोबतच कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

हेही वाचा : दोन वर्षांपासून फरार असलेला अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी राहुरीतून जेरबंद

महामंडळ सक्षम करण्यासाठी एकत्र यावे

मुंबई सेंट्रल येथील ‘वाहतूक भवन’ या महामंडळाच्या मुख्यालयात राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ही घोषणा करण्यात आली. यावेळी विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या आर्थिक व प्रशासकीय मागण्यांवर सकारात्मक आणि सविस्तर चर्चा झाली. बैठकीच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे सर्व कर्मचारी संघटनांना शुभेच्छा देताना, “सामंजस्याची भूमिका घेऊन महामंडळ अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करावे,” असे आवाहन केले.

नक्की पहा : सागर मोहळकर हत्याकांडात ‘चार्जशीट’ न दाखल झाल्याने आरोपीला मिळाला जामीन!

प्रशासनाला निर्देश (Pratap Sarnaik)

यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत, भविष्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू होताच तो तात्काळ प्रभावाने एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. तसेच वेतनवाढीची थकबाकीही आर्थिक परिस्थितीचा विचार करून टप्प्याटप्प्याने अदा केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सोबत एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांची बैठक आयोजित करण्यात येईल, असे देखील ग्वाही दिली.