Akole : सावित्रीबाई फुले मालिका पूर्ववत सुरू करण्याची मागणी

0
Akole : सावित्रीबाई फुले मालिका पूर्ववत सुरू करण्याची मागणी
Akole : सावित्रीबाई फुले मालिका पूर्ववत सुरू करण्याची मागणी

Akole : अकोले : समाजप्रबोधन, स्त्री शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणाऱ्या मालिकांना प्रोत्साहन मिळणे आवश्यक असताना अंधश्रद्धा, भोंदूगिरी आणि कौटुंबिक कलहाचे चित्रण करणाऱ्या मालिका मात्र सातत्याने सुरू राहतात. मात्र क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित मालिका अल्पावधीत बंद करण्यात आल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ही मालिका पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी शिवसेना अकोले तालुका कार्याध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रमोद मंडलिक यांनी केली आहे.

हेही वाचा :  ‘एसटी’ च्या कर्मचाऱ्यांना 58 टक्के महागाई भत्ता; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

मालिकेचे प्रसारण थांबविणे दुर्दैवी

यासंदर्भात तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, स्टार प्रवाह वाहिनीवर स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित मालिका जानेवारी २०२६ पासून प्रसारित होण्यास सुरुवात झाली होती. मात्र अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीत ही मालिका बंद करण्यात आली. समाजाला प्रेरणा देणाऱ्या आणि नव्या पिढीसमोर आदर्श निर्माण करणाऱ्या अशा मालिकेचे प्रसारण थांबविणे दुर्दैवी असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

नक्की पहा : सागर मोहळकर हत्याकांडात ‘चार्जशीट’ न दाखल झाल्याने आरोपीला मिळाला जामीन!

प्रेरणादायी मालिकांना प्रसारमाध्यमांनी प्राधान्य द्यावे (Akole)

सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण, स्त्री-मुक्ती आणि सामाजिक समतेच्या कार्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ही मालिका पुन्हा सुरू करणे आवश्यक असल्याचे मंडलिक यांनी सांगितले. तसेच अशा ऐतिहासिक आणि प्रेरणादायी मालिकांना प्रसारमाध्यमांनी अधिक प्राधान्य द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. या मागणीसाठी प्रमोद मंडलिक यांच्यासह एकल महिला समितीच्या प्रतिभा कुलकर्णी, संगीता साळवे, आरोटे, बबन तिकांडे, मच्छिंद्र मंडलिक, शेटे महाराज, मनोहर मालुंजकर, अनिल कोळपकर, संतोष मुर्तडक, स्वप्नील शहा, पठाण आदींनी निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या.