Ahilyanagar Police Force : अहिल्यानगर पोलीस दलात खांदेपालट; पोलीस अधीक्षकांनी काढले आदेश

किरण कुमार कबडी यांची शिर्डी संस्थान येथे बदली

0
Ahilyanagar Police Force : अहिल्यानगर पोलीस दलात खांदेपालट; पोलीस अधीक्षकांनी काढले आदेश
Ahilyanagar Police Force : अहिल्यानगर पोलीस दलात खांदेपालट; पोलीस अधीक्षकांनी काढले आदेश

Ahilyanagar Police Force : नगर : अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात (Ahilyanagar Police Force) प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल करण्यात आले असून जिल्हा पोलीस (District Police) आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार १९ पोलीस अधिकारी व सहायक पोलीस निरीक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या आणि नव्या नेमणुकांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. बदल्याच्या आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन (Mummaka Sudarshan) यांनी काढले आहेत.

नक्की वाचा : जागतिक नेत्रदान दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम व नेत्रदाता कुटुंबीयांचा सन्मान सोहळा उत्साहात

यांची झाली बदली

आदेशानुसार, पोलीस निरीक्षक जगदीश छबूराव भावळ यांची तोफखाना पोलीस ठाण्यातून नियंत्रण कक्ष, अहिल्यानगर येथे बदली करण्यात आली आहे. रविंद्र नरसिंग देशमुख यांना नियंत्रण कक्षातून राहुरी पोलीस ठाण्यात, विलास सहादू पुजारी यांना पाथर्डी पोलीस ठाण्यातून मानव संसाधन विभागात, संभाजी अभिमन्यू गायकवाड यांना कोतवाली पोलीस ठाण्यातून दक्षिण विभागात, तर किरण बाजीराव शिंदे यांना श्रीगोंदा पोलीस ठाण्यातून एचटीयू विभागात नियुक्त करण्यात आले आहे. संजय राजाभाऊ ठेंगे यांची राहुरी पोलीस ठाण्यातून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात, नितीन भास्कर देशमुख यांची श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातून कोतवाली पोलीस ठाण्यात, आनंद अशोक कोकरे यांची मानव संसाधन विभागातून पाथर्डी पोलीस ठाण्यात, प्रताप पांडुरंग दराडे यांची नियंत्रण कक्षातून नेवासा पोलीस ठाण्यात आणि बाबासाहेब दादू बारसे यांची शहर वाहतूक शाखेतून घारगाव पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल (Ahilyanagar Police Force)

तसेच महेश विष्णू पाटील यांना नियंत्रण कक्षातून शहर वाहतूक शाखेत, दिपक पुंडलिक सरोदे यांना नियंत्रण कक्षातून राहाता पोलीस ठाण्यात, बालाजी मदनराव वैद्य यांना एचटीयू विभागातून तोफखाना पोलीस ठाण्यात आणि हनुमान लहाणू गायकवाड यांना नियंत्रण कक्षातून कर्जत पोलीस ठाण्यात नियुक्त करण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षकांमध्येही महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले असून युवराज अर्जुनराव आठरे यांची आर्थिक गुन्हे शाखेतून लोणी पोलीस ठाण्यात, माणिक भाऊसाहेब चौधरी यांची एमआयडीसी पोलीस ठाण्यातून आर्थिक गुन्हे शाखेत, जगदीश मुलगीर यांची भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यातून आर्थिक गुन्हे शाखेत, तेजश्री विठ्ठल थोरात यांची कोतवाली पोलीस ठाण्यातून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तर हेमंत शिवाजी थोरात यांची घारगाव पोलीस ठाण्यातून एमआयडीसी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

किरण कुमार कबडी यांची शिर्डी संस्थान येथे बदली

पोलीस अधीक्षकांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ नवीन नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होण्याचे निर्देश दिले असून कार्यभार स्वीकारल्याचा अहवालही सादर करण्यास सांगितले आहे. या बदल्यांमुळे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये नव्या नेतृत्वाची नियुक्ती होणार असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन अधिक गतिमान होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे किरण कुमार कबडी यांची बदली शिर्डी संस्थान येथे करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेत प्रशासकीय समतोल राखण्यासह कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे मानले जात आहे.