Karjat News : घरगुती वादातून तरुण चढला मोबाईलच्या टॉवरवर; जीव देण्याची धमकी  

कर्जत पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल

0
Karjat News : घरगुती वादातून तरुण चढला मोबाईलच्या टॉवरवर; जीव देण्याची धमकी
Karjat News : घरगुती वादातून तरुण चढला मोबाईलच्या टॉवरवर; जीव देण्याची धमकी

Karjat News : कर्जत : घरगुती वाद घडल्याने एका २२ वर्षीय युवकाने चक्क कर्जत शहरातील मोबाईलच्या टॉवरवर (Mobile tower) चढत वरून खाली उडी मारण्याची धमकी (Threat) दिली. प्रत्यक्षदर्शींनी तत्काळ पोलीस दलास (police force) या घटनेची माहिती दिली. पोलिसांसह कुटुंबातील व्यक्तीनी देखील त्यास खाली येण्याची विनंती केली मात्र त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. रात्री उशिरापर्यंत त्या युवकाची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू होता. 

नक्की वाचा : अहिल्यानगर पोलीस दलात खांदेपालट; पोलीस अधीक्षकांनी काढले आदेश

कर्जत पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल

आज (ता. ११) संध्याकाळी ५ च्या सुमारास घरगुती वाद घडल्याने मयुर काळे (वय २२ वर्षे) हा युवक कर्जत शहराच्या एका मोबाईल टॉवर वर चढला. आणि आपण घरगुती वादामुळे वरून खाली उडी मारुन जीव देण्याची धमकी देऊ लागला. यावेळी प्रत्यक्षदर्शींनी त्याला खाली ये. तुला कोणी काही करणार नाही अशी हाक देखील दिली. मात्र तो कोणालाही जुमानत नसल्याने तत्काळ कर्जत पोलीस ठाण्यात वरील घटनेची माहिती देण्यात आली. कर्जत पोलीस देखील तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्याच्या कुटुंबास देखील पाचारण करण्यात आले. मात्र मयूर काळे कोणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीमध्ये नव्हता. तब्बल दोन-अडीच तास या युवकाने सर्वानाच चांगले जेरीस आणले. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

विशेष रेस्क्यु टीमला देखील केले पाचारण (Karjat News)

कर्जत पोलीस प्रशासन आणि कुटुंबातील व्यक्तींनी त्यास ध्वनी प्रेक्षपकद्वारे वारंवार खाली येण्याची विनंती केली. पण तो आपल्या निर्णयावर ठामच राहिल्याने अखेर त्याच्या सुरक्षिततेसाठी कर्जत नगरपंचायतीचे अग्निशमन विभाग, आरोग्य विभाग सतर्क ठेवण्यात आले असून अहिल्यानगरच्या विशेष रेस्क्यु टीमला देखील रात्री उशिरा पाचारण करण्यात आले. स्थानिक पोलीस प्रशासन या युवकास खाली आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते. अंधार पडल्याने त्याच्या बचावासाठी मर्यादा पडत होत्या.