Demand for action against inactive officials : निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी; ‘सुप्रभात ग्रुप’चे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Demand for action against inactive officials : निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी; 'सुप्रभात ग्रुप'चे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

0
Demand for action against inactive officials : निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी; 'सुप्रभात ग्रुप'चे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
Demand for action against inactive officials : निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी; 'सुप्रभात ग्रुप'चे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Demand for action against inactive officials : नगर : अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) (Food and Drug Administration) विभागाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत ५३ धाडी टाकून ३३ जणांना अटक करत कोट्यवधी रुपयांचा बनावट व भेसळयुक्त मुद्देमाल जप्त केल्याबद्दल आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या कार्याने सुप्रभात मॉर्निंग ग्रुप’ व्यावतीने कौतुक करण्यात आले आहे. तसेच या विभागात पूर्वी कार्यरत असलेल्या निष्क्रिय अपधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी (Demand for action against inactive officials) सुप्रभात मॉर्निंग ग्रुप’च्या सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे केली आहे.

नक्की वाचा : घरगुती वादातून तरुण चढला मोबाईलच्या टॉवरवर; जीव देण्याची धमकी

प्रामाणिक अधिकाऱ्याच्या नियुक्तीबद्दल मुख्यमंत्र्यांच अभिनंदन

याबाबत ‘सुप्रभात मॉर्निंग ग्रुप’ च्या सदस्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, जनतेच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या अन्न व औषण प्रशासन विभागात तुकाराम मुंडे यांच्यासारख्या पडाडीच्या आणि प्रामाणिक प्रामाणिक अधिकाऱ्याची नियुक्ती केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

यापूर्वी प्रभावी करवाया का नाही? (Demand for action against inactive officials)

मुंढे यांच्या नियुक्तीनंतर केवळ तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात कारवाई होऊ शकते, तर यापूर्वीच्या काळात अशा प्रभावी करवाया का झाल्या नाहीत, हा सर्वसामान्य जनतेसमोर उभा राहिलेला प्रश्न आहे. जनतेच्या, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांचे रॅकेट फोफावण्यास कारणीभूत ठरलेल्या तत्कालीन अधिकाऱ्यांची सखोल सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.