
Death by drowning in a farm pond : नेवासा : तालुक्यातील पाचुंदा परिसरात अत्यंत दुर्दैवी हृदयद्रावक घटना घडली असून सख्या भाऊ-बहिणीचा शेत तळ्यात बुडून मृत्यू (Death by drowning in a farm pond) झाल्याने गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
अचानक तळ्यात घसरल्याने अपघात
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोघेही तळ्याजवळ पेरू खाण्यासाठी गेले असता अचानक स्वाती रामदास खरात वय १६ वर्षे ही तळ्यात घसरली व तिला वाचवण्यासाठी भाऊ किरण रामदास खरात वय १५ वर्षे याने उडी मारली परंतु दोघांना पोहता येत नसल्याने दोघांचा दुर्दैवी अंत झाला. पाण्यात पडल्याने ही दुर्घटना (Accident) घडली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले, मात्र दोघांनाही वाचविण्यात अपयश आले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
मृतांच्या अतिशय गरीब कुटुंबातील (Death by drowning in a farm pond)
या हृदयद्रावक घटनेमुळे खरात परिवारासह पाचुंदा गावासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आई वडील अतिशय गरीब कुटुंबातील असून ड्रायव्हर काम करत आहे. तर चंद्रकांत गणपत खरात यांचे नात व नातू होते. ते साहेबराव घाडगे पाटील त्रिमूर्ती संकूल तेलकुडगाव येथे शिक्षण घेत होते.


