FRP : शेवगाव : तालुक्यातील बोधेगाव येथील केदारेश्वर सहकारी साखर कारखान्यावर शासनाने एफआरपी (फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राईस) थकीत ठेवल्याप्रकरणी आरआरसी (जप्ती) कारवाई केली आहे. यासंदर्भात कारखाना व्यवस्थापनाने अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
हेही वाचा : पाचुंदा येथे हृदय द्रावक घटना सख्या भाऊ-बहिणीचा तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
एफआरपी रक्कम थकली
माहितीनुसार, सन २०२५-२६ च्या गाळप हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपीची काही रक्कम अद्याप थकीत असल्याने शासनाने ही कारवाई केली आहे. कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांची थकीत देयके लवकरात लवकर अदा करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे. कारखान्याने दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत कारखान्यास ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचे पैसे प्रलंबित आहेत. ही रक्कम शक्य तितक्या लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी आवश्यक बँकस्तरीय प्रक्रिया सुरू असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.
हेही पहा : मुंढेंच्या कारवाईने गुऱ्हाळ चालक धास्तावले! 400 गुऱ्हाळे बंद; नेमकं काय घडलं?
कारखाना प्रशासनाचे आवाहन (FRP)
दरम्यान, कारखान्यावर जप्तीची कारवाई झाल्याची माहिती वृत्त माध्यमांमध्ये समोर आल्यानंतर शेतकरी व ऊस वाहतूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर कारखाना प्रशासनाने खुलासा करत शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.



