- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय कदम
Women Safety : नगर : कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित (Women Safety), सन्मानजनक व भेदभावमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी ‘कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, २०१३’ अर्थात ‘पॉश’ (POSH Act) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. १० किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असलेल्या सर्व आस्थापनांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय कदम (Sanjay Kadam) यांनी केले आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
सर्व आस्थापनांमध्ये समिती स्थापन करणे बंधनकारक (Women Safety)
‘पॉश’ कायद्यांतर्गत ज्या शासकीय, निमशासकीय तसेच खासगी आस्थापनांमध्ये १० किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, त्या सर्व आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. महिला व बाल विकास विभागाच्या शासननिर्णयानुसार संबंधित संस्थांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करून तिची नोंद ‘शी-बॉक्स’ पोर्टलवर करणे आवश्यक आहे.
तसेच ज्या आस्थापनांमध्ये १० पेक्षा कमी कर्मचारी कार्यरत आहेत, त्या आस्थापनांसाठी तक्रार निवारणाच्या उद्देशाने जिल्हास्तरावर स्थानिक तक्रार समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. ‘पॉश’ कायद्यातील कलम २५ नुसार शासन संबंधित आस्थापनांकडून माहिती मागवू शकते तसेच तपासणीही करू शकते.



