FDA : नगर : राज्यात गुटखा आणि पानमसाला यांसारख्या प्रतिबंधित उत्पादनांच्या उत्पादन, साठवणूक आणि विक्रीविरोधात आता थेट आणि कठोर कारवाई होणार आहे. अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाचे नवे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत.
हेही वाचा : दोन महिने उलटूनही भोंदू गडगे बाबाचे साथीदार अद्याप पसार
मकोका लागणार
तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच गुटखा, पानमसाला आणि खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांत राज्यभरात अनेक धाडी घेण्यात आल्या असून, मोठ्या प्रमाणात माल जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्रात अवैध गुटखा, तंबाखू आणि निकोटीनयुक्त पानमसाल्याचा व्यवसाय करणाऱ्या संघटित टोळ्या आणि माफियांचे कंबरडे मोडण्यासाठी थेट मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे अत्यंत कठोर आदेश दिले आहेत.
नक्की पहा : मिरजगाव येथून प्रतिबंधित ड्रग्ज इंजेक्शनचा साठा जप्त; एकजण जेरबंद
अधिकाऱ्यांना दिलेले मुख्य निर्देश (FDA)
या पार्श्वभूमीवर मुंढे यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की, “प्रतिबंधित पदार्थ विक्री करणाऱ्या कोणत्याही विक्रेत्यांवर आता थेट कारवाई करा. कोणत्याही प्रकारची दखल न घेता कायद्यानुसार कठोर कारवाई करावी.” सर्व जिल्ह्यांत गुटखा, पानमसाला उत्पादक आणि विक्रेत्यांवर नियमित छापे टाकणे, अवैध साठे आढळल्यास दुकाने सील करणे आणि माल जप्त करणे, दोषींना तत्काळ अटक करून कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करणे. अशा सक्त सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.



