
Radhakrishna Vikhe Patil : नगर : भाजप (BJP) सत्तेत आल्यानंतर देशाच्या विकासाला नवी दिशा मिळाली. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना विकासाच्या केंद्रस्थानी ठेवून अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबवल्या. कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आले असून त्याचा लाभ देशातील लाखो शेतकऱ्यांना होत आहे. तसेच आयुष्मान भारत (Ayushman Bharat) योजनेसारख्या योजनांमुळे सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यसेवेचे मोठे संरक्षण मिळाले आहे, असे जलसंधारण मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी सांगितले.
नक्की वाचा : दोन महिने उलटूनही भोंदू गडगे बाबाचे साथीदार अद्याप पसार
दळणवळण आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीवर भर
केंद्रातील भाजप सरकारला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले की, देशभरात रस्ते विकास, दळणवळण आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला. रेल्वेचे आधुनिकीकरण, नवीन महामार्ग, डिजिटल सुविधांचा विस्तार आणि विविध विकास प्रकल्पांमुळे भारताची प्रगती वेगाने होत असल्याचे त्यांनी सांगितले.विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचेही कौतुक केले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
१२ वर्षांच्या कार्यकाळात देशाची उल्लेखनीय प्रगती (Radhakrishna Vikhe Patil)
ते म्हणाले की, मोदी यांच्या नेतृत्वाला आज जगभरात मान्यता मिळाली आहे. एकेकाळी जागतिक अर्थव्यवस्थेत पंधराव्या क्रमांकावर असलेला भारत आज तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्यामुळे भारत आज जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये गणला जात आहे. देशाची आर्थिक आणि सामाजिक प्रगती ही प्रभावी नेतृत्व आणि दूरदृष्टीपूर्ण धोरणांचे फलित असल्याचे त्यांनी नमूद केले. भाजप सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशाने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती केली असून भविष्यातही विकासाचा हा प्रवास अधिक वेगाने सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, नगरसेवक यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


