Amol Khatal : धांदरफळच्या विकासासाठी राजकारण आड येऊ देणार नाही : अमोल खताळ

सामाजिक उपक्रमांना आवश्यक ते सहकार्य कायम राहील

0
Amol Khatal : धांदरफळच्या विकासासाठी राजकारण आड येऊ देणार नाही : अमोल खताळ
Amol Khatal : धांदरफळच्या विकासासाठी राजकारण आड येऊ देणार नाही : अमोल खताळ

Amol Khatal : संगमनेर : धर्म, अध्यात्म आणि समाजसेवा यांचा परस्परसंबंध अधोरेखित करत ग्रामस्थांच्या प्रेमामुळेच जनसेवेची प्रेरणा मिळत आहे. अखंड हरिनाम सप्ताह (Akhand Harinam Saptah) ही नारदांची गादी असून, या व्यासपीठावर संत-महंतांचे आशीर्वाद घेण्याचे भाग्य मला लाभते. त्या आशीर्वादाच्या बळावरच गेल्या दीड वर्षांपासून ऊन, वारा, पाऊस आणि संकटांची पर्वा न करता जनतेच्या सेवेसाठी कार्यरत आहे. निवडणुकी पुरते मी राजकारण करतो मात्र, निवडणुका संपल्या की राजकारण (Politics) बाजूला ठेवून सर्वसामान्य जनतेची कामे करण्यास प्राधान्य देतो त्यामुळे धांदरफळच्या विकासासाठी आपण कधीच राजकारण आड येऊ देणार नाही अन् ग्रामस्थांच्या विश्वासाला कुठलाही तडा जाऊ देणार नाही, असा विश्वास आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांनी व्यक्त केला.

नक्की वाचा : विधानपरिषद निवडणुकीतील माघार दबावापोटी; निवडणूक रद्द करण्याची दत्तात्रेय पानसरे यांची मागणी

नीलम खताळ यांच्या हस्ते प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्दला अधिक मासाच्या निमित्त त्रि वार्षिक अखंड हरिनाम सप्ताहाचा दीपोत्सव आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्या हस्ते प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. तसेच ज्ञानेश्वरी गाथा पारायणाची सांगता करण्यात आली. आमदार खताळ म्हणाले, धांदरफळ मधील सहकारी व ग्रामस्थांनी दिलेले प्रेम, संस्कार आणि पाठबळ यांचे ऋण या जन्मात फेडणे शक्य नाही. लहानपणापासूनच मला अध्यात्माची आवड असल्याने वारकरी संप्रदाय, सप्ताह आणि धार्मिक कार्यक्रमांशी आपले भावनिक नाते आहे. श्रद्धा आणि सबुरीच्या मार्गाने समाज पुढे जात आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

सामाजिक उपक्रमांना आवश्यक ते सहकार्य कायम राहील (Amol Khatal)

आमदार झाल्यानंतर तालुक्यातील प्रत्येक गावातील धार्मिक, सामाजिक व विकासात्मक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक गावांतील सप्ताह समित्या आणि ग्रामस्थ केवळ उपस्थितीची अपेक्षा व्यक्त करतात, हेच माझे खरे यश आहे. जोपर्यंत आपण लोकप्रतिनिधी आहोत, तो पर्यंत धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांना आवश्यक ते सहकार्य कायम राहील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी सुदाम महाराज कोकणे, अर्जुन महाराज खताळ, बाळासाहेब खताळ, भागवत महाराज खताळ, विश्वनाथ महाराज नवले, सुनील महाराज संगमनेरकर यांच्यासह धांदरफळ खुर्द येथील महिला, पुरुष, तरुण-तरुणी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.