नगर : नांदेड मधील (Nanded Crime) ऑनर किलिंग प्रकरणातील (Honor killing case) आंचल मामीडवार (Anchal Mamidwar) हिने प्रियकर सक्षम ताटे याच्या मृतदेहाशी लग्न केले होते. पण काही दिवसांपूर्वी सक्षमच्या आईने प्रसारमाध्यमांसमोर येत आंचल घर सोडून निघून गेल्याचे सांगितले. त्यानंतर याप्रकरणाची चर्चा सुरू झाली. आंचल अशी अचानक घर सोडून का गेली? प्रेमाच्या आणाभाका कशी विसरली अशी चर्चा सोशल मीडियावर चर्चा झाली. आता आंचल मामीडवार हिने माध्यमांसमोर येत घर सोडण्याविषयी धक्कादायक खुलासा केला आहे.
नक्की वाचा : आता महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ‘शेतकरी दर्जा’; फडणवीस सरकार आणणार नवं विधेयक
सक्षम ताटेचा गोळ्या घालून खून (Anchal Mamidwar)
प्रेमसंबंधातून सक्षम ताटेचा गेल्या वर्षी गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या रक्तरंजित प्रेम कहाणीने संपूर्ण महाराष्ट्र हादरले होते. तर आंचल हिने घरच्यांच्या विरोधात साक्ष दिली होती. स्वतःच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केला होता. सक्षमच्या घरी कायमचं राहणार असल्याचे तिने म्हटले होते. सक्षम ताटेच्या आईने माध्यमांना माहिती देताना सांगितले होते की, आंचल आजीकडे जाण्याचा बहाणा करत घर सोडून गेली आहे. त्यानंतर समाज माध्यमांवर उलट सुलट चर्चा सुरू झाली होती. काहींनी आंचलची बाजू उचलून धरत तिला तिचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे म्हटले होते. तर याप्रकरणी आता आंचल मामीडवार हिने धक्कादायक खुलासा केला आहे.
अवश्य वाचा : अहिल्यानगरच्या आदिती शिदोरेची ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील स्टेट क्रिकेट संघात निवड
आंचल नेमकं काय म्हणाली? (Anchal Mamidwar)
सक्षमचा लहान भाऊ आपल्याशी गैरवर्तन करत असल्याचा गंभीर आरोप आंचल मामीडवार हिने केला आहे. तो गैरवर्तन करत असल्यानेच आपण घर सोडण्याचा निर्णय घेतल्याचे प्रत्युत्तर आंचल मामीडवार हिने दिले आहे. तर सक्षमला न्याय मिळवून देण्यासाठी आपण एकटेच लढत असल्याचा दावाही तिने केला. त्यामुळे या प्रकरणाला अजून वेगळी दिशा मिळाली आहे. आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी तीव्र झाल्याचे समोर आले आहे. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी नांदेड शहरातील इतवारा परिसरात सक्षम ताटे याच्यावर गोळीबार करण्यात आला होता आणि फरशीचे घाव घालून त्याचा खून करण्यात आला होता. आंचलचे प्रेमसंबंध तिच्या कुटुंबीयांना मान्य नव्हते. या घटनेपासून आंचल ही सक्षमच्या घरीच राहत होती.



