परिचर संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा सत्कार
Ahilyanagar Zilla Parishad : नगर : जिल्हा परिषदेच्या परिचर संवर्गातून आरोग्य सेवक (Health Worker) (पुरुष) या पदावर तब्बल 85 परिचारांची पदोन्नती करण्यात आली. अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या (Ahilyanagar Zilla Parishad) इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने परिचारांना पदोन्नती मिळाली आहे.
परिचर संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सत्कार
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी (Anand Bhandari), उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे आदी उपस्थित होते. परिचर संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष निलेश गाडेकर, सागर आगरकर, सचिन चितळे, ऋषिकेश बनकर, राहुल साळवे, अनिल येनगुल, भरत शेंडगे, दादा बरबडे, किरण खेडकर, चंद्रशेखर इरकर, विजय वाबळे आदी उपस्थित होते.
नक्की पहा : शेतकऱ्यांनी तुकाराम मुंढे यांच्या प्रतिमेला घातला दुग्धाभिषेक
मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी म्हणाले,(Ahilyanagar Zilla Parishad)
शासन निर्णय 2025 मधील अधिसूचनेनुसार आज जिल्हा परिषदेमध्ये इतिहासात पहिल्यांदाच 89 पैकी 85 परिचर पदोन्नतीने आरोग्य सेवक झाले. चार जणांनी नकार दिला.ही प्रक्रिया अतिशय पारदर्शक समुपदेशनाने पार पाडली. पदोन्नती झालेल्या सर्वांचे अभिनंदन. अहिल्यानगर जिल्ह्याची परंपरा सातत्याने पुढे राहण्याची आहे, ती या पदोन्नतीच्या माध्यमातून कायम ठेवली.

हेही वाचा : दत्तात्रय पानसरे यांनी माघारीतून काय मिळविले
संघटनेचे अध्यक्ष निलेश गाडेकर यांनी सांगितले की, महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात परिचर पदोन्नतीची प्रक्रिया अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच पार पडली, त्याबद्दल परिचर संघटनेच्या वतीने प्रशासनाचे आभार. त्यांनी सर्व परिचर बांधवांचेही सहकार्याबद्दल आभार मानले.



