Anna Hazare : अण्णा हजारे यांच्या ‘स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी’ तर्फे सामाजिक सेवा गौरव पुरस्कार जाहीर

पंचसूत्रीच्या प्रयोगातून त्यांनी गावाची यशस्वी उभारणी

0
Anna Hazare : अण्णा हजारे यांच्या ‘स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी’ तर्फे सामाजिक सेवा गौरव पुरस्कार जाहीर
Anna Hazare : अण्णा हजारे यांच्या ‘स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी’ तर्फे सामाजिक सेवा गौरव पुरस्कार जाहीर

Anna Hazare : पारनेर : ‘मानव सेवा हीच ईश्वर सेवा’ हे ब्रीदवाक्य समोर ठेवून आयुष्यभर निष्काम भावनेने समाजसेवा करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्या ‘स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी’ (Swami Vivekananda Gratitude Fund) संस्थेद्वारे २०२५-२६ या वर्षासाठीचे प्रतिष्ठित ‘अण्णा हजारे सामाजिक सेवा गौरव पुरस्कार’ (Social Service Honor Award) जाहीर करण्यात आले आहेत. समाजात निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या ध्येयवेड्या व्यक्ती आणि संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रतिवर्षी हे पुरस्कार दिले जातात.

नक्की वाचा : सरकारने शेतकऱ्यांना विकासाच्या केंद्रस्थानी ठेवून अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबवल्या : राधाकृष्ण विखे पाटील

पंचसूत्रीच्या प्रयोगातून गावाची यशस्वी उभारणी

अण्णासाहेब हजारे यांनी आपल्या देशसेवेच्या प्रवासाचा आढावा घेताना सांगितले की, १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर मिळालेला पुनर्जन्म त्यांनी समाजकार्यासाठी समर्पित केला. स्वतःच्या गावातून सुरू केलेल्या पंचसूत्रीच्या (नशाबंदी, कुऱ्हाडबंदी, चराईबंदी, नसबंदी आणि श्रमदान) प्रयोगातून त्यांनी गावाची यशस्वी उभारणी केली. या कार्यातूनच पुढे माहितीचा अधिकार, जनलोकपाल आणि ग्रामसभेला अधिकार यांसारखे महत्त्वपूर्ण कायदे देशाला मिळाले. मिळालेली सर्व पुरस्कार रक्कम समाजालाच परत मिळावी, या उदात्त हेतूने १९९८ मध्ये त्यांनी ‘स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी’ची स्थापना केली. सध्या १ कोटी ६७ लाख रुपयांच्या ठेवींवरील व्याजातून हे पुरस्कार प्रदान केले जातात.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

यावर्षीचे पुरस्कार विजेते खालीलप्रमाणे (Anna Hazare)

१. यजुवेंद्र महाजन (दीपस्तंभ फाउंडेशन, मनोबल, जळगाव)
२. दीपक नागरगोजे (शांतीवन प्रकल्प, आर्वी, बीड)
३. शिवाजीराव डोळे (व्यंकटेश्वरा को-ऑपरेटिव्ह पॉवर ॲन्ड ॲग्रो प्रोसेसिंग, नाशिक)
४. अनंत झेंडे (महामानव बाबा आमटे सेवा संस्था, चिखली,अहिल्यानगर)
५. डॉ. नंदू पालवे (सेवा संकल्प प्रतिष्ठान, बुलढाणा)

संस्थेच्या निवड समितीने हे पुरस्कार जाहीर केले असून, येत्या १५ जून रोजी एका विशेष समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीत मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन हे पुरस्कार प्रदान केले जातील. समाजकार्यात झोकून देऊन कार्य करणाऱ्या या ध्येयवीरांच्या कार्याचा गौरव झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.