Dattatray Pansare : दत्तात्रय पानसरे यांनी माघारीतून काय मिळविले

कोणालाही काहाही शब्द देण्यात आला नसल्याचे स्पष्ट

0
Dattatray Pansare : दत्तात्रय पानसरे यांनी माघारीतून काय मिळविले
Dattatray Pansare : दत्तात्रय पानसरे यांनी माघारीतून काय मिळविले

Dattatray Pansare : नगर : विधान परिषदेच्या (Legislative Council) स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीत अहिल्यानगरमधून (Ahilyanagar) अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे (Dattatray Pansare) यांनी मोठ्या नाट्यमय घडामोडींनंतर माघार घेतली. मात्र, या माघारीतून त्यांनी नेमके काय साध्य केले, भविष्यात याचा त्यांना काय लाभ होणार याची चर्चा आता सुरू झाली आहे.

नक्की वाचा : प्राजक्त तनपुरेंना भावलेला ‘विखे पॅटर्न’ नेमका काय?

कोणालाही काहाही शब्द देण्यात आला नसल्याचे स्पष्ट

अर्ज माघारीच्या दिवशी पानसरे यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली. त्यापूर्वी मोठ्या नाट्यमय घडामोडी झाल्या. यावेळी बोलताना त्यांनी आपल्याला भविष्यात आमदार करण्याचा शब्द मिळाल्याचे सांगितले होत. मात्र, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी असा कोणालाही काहाही शब्द देण्यात आला नसल्याचे त्याचवेळी स्पष्ट केले होते. मुळात पानसरे यांनी माघारीपूर्वी मंत्री विखे पाटील आणि त्यानंतर खुद्द उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्यासोबतही चर्चा केली होती. मात्र, त्यातून तोडगा निघाला नव्हता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांचे बोलणे करून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. शेवटी अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांची मध्यस्थी यशस्वी झाल्याचे दिसून आले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

जगतापांशी बोलणे झाल्यानंतर पानसरे यांच्या माघारीवर शिक्कामोर्तब (Dattatray Pansare)

जगताप यांच्याशी बोलणे झाल्यानंतर पानसरे यांनी माघारीवर शिक्कामोर्तब केले, असे त्या दिवशी दिसून आले. अशी माघार घेताना काही तरी पदरात पाडून घेण्याची नेत्यांची पद्धत असते. नगरचेच उदाहरण घेतले तर मागील विधानसभा निवडणुकीत माघार घेताना विवेक कोल्हे यांना आमदारकीचा शब्द दे्ण्यात आला होता. त्यानुसार त्यांना अलीकडेच विधान परिषदेची उमेदवारी मिळाली. त्यानंतर राहुरी पोटनिवडणुकीच्या वेळी प्राजक्त तनपुरे यांनाही असाच शब्द देण्यात आला होता. तोही अखेर पूर्ण झाला. तसा पानसरे यांना काय शब्द देण्यात आला, त्याचे पुढे काय होणार अशी चर्चा आहे.

वातावरण शांत करण्याचा शब्द घेतल्याचे सांगण्यात येते

पानसरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत. सध्या त्यांना याच पक्षाच्या कोट्यातून पणन महामंडळाचे अध्यक्षपद मिळालेले आहे. मात्र, या महामंडळात सध्या कुरबुरी सुरू आहेत. भाजपच्या काही संचालकांनी पानसरे हटाव मोहीम सुरू केल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पानसरे यांनी माघारीच्या बदल्यात हे वातावरण शांत करण्याचा शब्द घेतल्याचे सांगण्यात येते. तर आणखी एक चर्चा अशी आहे की, लवकरच होणाऱ्या अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत त्यांना संधी दिली जाणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र, याबद्दल पानसरे किंवा त्यांना माघार घेण्यासाठी प्रयत्न करणारे नेतेही जाहीरपणे काहीही बोलले नाहीत.

चर्चा स्वतःकडे ओढून घेण्यात पानसरे यांना यश

स्वतः पानसरेही याबद्दल बोलत नाही. उलट पानसरे यांच्या मते त्यांना आमदार व्हायचे होते, आता नाही संधी मिळाली तर भविष्यात नक्की संघी देण्याचा शब्द आपल्याला भाजपच्या नेत्यांनी दिला आहे,असे पानसरे माघारीच्या दिवशी नाट्याचा समारोप करताना बोलले होते. तर दुसरीकडे त्याचवेळी पालकमंत्री विखे पाटील यांनी मात्र माघारीसाठी कोणालाही काहीही शब्द देण्यात आला नसल्याचे सांगत होते. त्यामुळे पानसरे यांना माघारीतून नेमके काय मिळाले, हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरीतच आहे. त्यांनी त्यांचे राजकीय महत्व मात्र वाढवून घेतले आहे. जी चर्चा दुसरे अपक्ष उमेदवार करण ससाणे यांची होणे अपेक्षित होते, ती चर्चा स्वतःकडे ओढून घेण्यात पानसरे यांनी यश मिळाल्याचे दिसते. याचा प्रत्यक्ष लाभ त्यांना कसा आणि कधी होतो, हे लवकरच कळेल.