
Raid on a spurious fertilizer factory : नगर : नेवासा तालुक्यातील शिंगवेतुकाई एमआयडीसी परिसरातील कृषी गौरव फर्टीलायझर प्रा. लि.या कंपनीवर कृषी विभागाने धडक कारवाई (Raid on a spurious fertilizer factory) करत तब्बल २१ लाख ८० हजार ४८६ रुपये किमतीचा बेकायदेशीर खतसाठा जप्त (Illegal fertilizer stock seized) केला आहे. नामांकित कंपन्यांच्या नावाचा गैरवापर करून बनावट गोण्यांमध्ये खताची साठवणूक व पॅकिंग करून शासन आणि शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे या कारवाईत उघडकीस आले आहे. याप्रकरणी कंपनीचे मालक किरण चंद्रकांत दौंडकर (रा. केडगाव, अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात (Sonai Police Station) विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : ठाकरेंशी पुन्हा गद्दारी! भाऊसाहेब वाकचौरे शिंदेंच्या तंबूत दाखल होणार…?
यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई निविष्ठा व गुण नियंत्रण संचालनालयाचे संचालक सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेजुरकर, मुख्य गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक प्रवीण देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
बेकायदेशीर खत निर्मिती(Raid on a spurious fertilizer factory)
मिळालेल्या माहितीनुसार, १५ जून २०२६ रोजी जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी निलेश अभंग यांना संबंधित कंपनीमध्ये बेकायदेशीर खत निर्मिती व साठवणूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर नेवासा पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा खत नियंत्रण निरीक्षक वाल्मीक सुडके, कृषी अधिकारी सुहास धस, कृषी विकास अधिकारी विकास काळे आणि पारनेरचे कृषी अधिकारी राहुल कदम यांच्या पथकाने कंपनीच्या उत्पादन केंद्र व गोदामावर अचानक छापा टाकला.
झडतीदरम्यान गोदामात विविध खत कंपन्यांची नावे छापलेल्या २ हजार ३४ खतांच्या गोण्या पॅकिंग केलेल्या अवस्थेत आढळून आल्या. पथकाने तेथील प्रतिनिधीकडे बिल बुक, साठा नोंदवही तसेच ओ-फॉर्मसह अन्य आवश्यक कागदपत्रांची मागणी केली. मात्र, कोणतीही वैध कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत. त्यामुळे हा संपूर्ण खतसाठा बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले.
कृषी विभागाने तत्काळ कारवाई करत संबंधित खतसाठा जप्त केला. तसेच शासनाची दिशाभूल करून अनधिकृतपणे खतांचे पॅकिंग व साठवणूक केल्याप्रकरणी कंपनी मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, बेकायदेशीर खत व्यवसायाशी संबंधित इतर बाबींचीही चौकशी केली जात असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.


