Ahilyanagar District Cooperative Bank Election : जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक : नवे राजकारण की जुनी परंपरा? भाजपच्या भूमिकेकडे लक्ष

Ahilyanagar District Cooperative Bank Election : जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक : नवे राजकारण की जुनी परंपरा? भाजपच्या भूमिकेकडे लक्ष

0
District Cooperative Bank Election : जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक : नवे राजकारण की जुनी परंपरा? भाजपच्या भूमिकेकडे लक्ष
District Cooperative Bank Election : जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक : नवे राजकारण की जुनी परंपरा? भाजपच्या भूमिकेकडे लक्ष

Ahilyanagar District Cooperative Bank Election : नगर : अहिल्यानगरच्या जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची (Ahilyanagar District Cooperative Bank Election) प्रक्रिया सुरू झाली आहे. सोसायट्यांचे ठराव करून मतदार (Voter) निश्चित करण्याची अतिशय महत्वाचा टप्पा सध्या सुरू आहे. मोर्चेबांधणीची सुरूवात येथूनच होत असते. नगरच्या जिल्हा बँकेची आतापर्यंतची परंपरा पहाता पक्षीय राजकारण बाजूला ठेवत नेते मंडळी एकत्र येतात, असे दिसून येते. अर्थात यात सोयरेधायरे आणि नातेवाईक असतातच. यावेळी मात्र परिस्थिती बदली असून केंद्र आणि राज्यात भाजपची (BJP) सत्ता आल्यापासून छोट्या मोठ्या संस्थांच्या निवडणुकांमध्येही पक्षीय राजकारण येत आहे. आशिया खंडातील मोठ्या मानल्या जाणाऱ्या नगच्या जिल्हा बँकेत भाजप पक्ष म्हणून लक्ष घालण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे बँकेची निवडणूक आणि राजकीय परंपरा बदलण्याची चिन्हे आहेत.

नक्की वाचा : भाऊसाहेब वाकचौरे यांची पहिली प्रतिक्रिया

राज्यात आणि जिल्ह्यात अनेक राजकीय बदल

स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्या पाठोपाठ झालेली विधान सभा आणि विधान परिषदेची निवडणूक, काही साखर कारखान्यांच्या निवडणुका त्यानंतर आता जिल्हा बँकेची निवडणूक सुरू होत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा सहकार आणि सत्तेच्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे. राज्यात आणि जिल्ह्यात अनेक राजकीय बदल झाले असले तरी जिल्हा बँकेचे राजकारण मात्र नेहमीच वेगळ्या धाटणीचे राहिले आहे. येथे पक्षीय निष्ठेपेक्षा नातेसंबंध, सोयरेधायरे, गट आणि व्यक्तिगत समीकरणांना अधिक महत्त्व मिळत आले आहे. अहमदनगर जिल्हा सहकारी बँक ही केवळ आर्थिक संस्था नाही, तर ती जिल्ह्यातील राजकीय शक्तीचे केंद्र मानली जाते. जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांचा उदय सहकारातून झाला. त्यामुळे जिल्हा बँकेवरील नियंत्रण म्हणजे ग्रामीण भागातील राजकीय प्रभाव, आर्थिक ताकद आणि संघटनात्मक बळ असे समीकरण तयार झाले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पक्षांपेक्षा गटांचे राजकारण (Ahilyanagar District Cooperative Bank Election)

जिल्हा बँकेच्या निवडणुकांचा इतिहास पाहिला तर येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना किंवा भाजप या पक्षांची अधिकृत लढत क्वचितच दिसून आली. निवडणुकीच्या वेळी सर्व पक्षांचे नेते एका पॅनेलमध्ये आणि त्यांचे विरोधक दुसऱ्या पॅनेलमध्ये दिसत असत. अनेकदा विधानसभेत किंवा लोकसभेत एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले नेते जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मात्र एकाच मंचावर उभे राहिल्याचेही पहायला मिळाले.

अर्थात राजकीय गट पाहिले तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात प्रामुख्याने ही लढत होताना दिसते. दोघेही एकाच पक्षात असले तरी असेच वातावरण होते. गेल्या अनेक दशकांत जिल्ह्यातील काही मोजक्या राजकीय घराण्यांचे आणि प्रभावशाली नेत्यांचे जिल्हा बँकेवर वर्चस्व राहिले. जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने, दूध संघ, खरेदी-विक्री संघ आणि विविध सेवा संस्थांच्या माध्यमातून तयार झालेली मतदारसंघाची रचना या नेतृत्वाला अनुकूल ठरत गेली.

यावेळी परिस्थिती मात्र काहीशी बदललेली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे विभाजन झाले आहे. दुसरीकडे भाजपने जिल्ह्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा मतदारसंघ आणि संघटनात्मक पातळीवर मजबूत पकड निर्माण केली आहे.


लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमधील कामगिरी पाहता भाजप हा जिल्ह्यातील सर्वात प्रभावी राजकीय पक्ष म्हणून समोर आला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही या बदलाचा प्रभाव पडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.