Bhausaheb Wakchaure : भाऊसाहेब वाकचौरे यांची पहिली प्रतिक्रिया

Bhausaheb Wakchaure : भाऊसाहेब वाकचौरे यांची पहिली प्रतिक्रिया

0
Bhausaheb Wakchaure : भाऊसाहेब वाकचौरे यांची पहिली प्रतिक्रिया
Bhausaheb Wakchaure : भाऊसाहेब वाकचौरे यांची पहिली प्रतिक्रिया

Bhausaheb Wakchaure : नगर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे (Uddhav Thackeray) देवमाणूस आहेत, त्यांच्याबद्दल कुठलीही तक्रार नाही, परंतु शिर्डी लोकसभा मतदार संघाचे (Shirdi Lok Sabha Constituency) सर्वांगीण विकासासाठी सत्तेसोबत जाण्याचा प्रामाणिक निर्णय घेतला आहे. अशी प्रतीक्रीया खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure) यांनी व्यक्त केली आहे.

अवश्य वाचा : युट्यूबवरील चोरीची क्लृप्ती पाहून उबेर चालकाला लुटले; एमआयडीसी पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात

बाळासाहेबांचे विचार पोहचविण्यासाठी काम करणार

ज्या जनतेने विश्वासाने निवडून दिले त्यांच्या वेदना कमी करू शकत नसेल तर लोकप्रतिनिधी म्हणून राहण्यात अर्थ उरत नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ जी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली उत्तरनगर जिल्ह्यात सर्वांना सोबत घेऊन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार पोहचविण्यासाठी यापुढे तळागाळात काम करणार.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

मतदारसंघातील जनमत माझ्या निर्णयाशी सहमत (Bhausaheb Wakchaure)

प्रसार माध्यमातून माझी दिशाभूल करणारी व आर्थिक विषयक चुकीची बदनामी केली जात आहे, माझें काही सहकारी रोष व्यक्त करत आहे परंतु लोकसभा मतदारसंघातील जनमत व शिवसैनिक माझ्या या निर्णयाशी सहमत आहे. मतदार संघाच्या विकासासाठी व निवडून दिलेल्या जनतेप्रति स्वच्छ हेतूने घेतलेला निर्णय सामान्य जनतेला मान्य आहे. या निर्णयाचे मतदार बांधव व शिवसैनिक स्वागत करत आहे, लवकरच शिर्डीतील ताकद सिद्ध करू. असेही खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी स्पष्ट केले.