Vruddheshwar Cooperative Sugar Factory : वृद्धेश्वर कारखाना निवडणूक बिनविरोध? उद्या चित्र होणार स्पष्ट

४१ उमेदवारांचे एकूण ४४ उमेदवारी अर्ज दाखल

0
Vruddheshwar Cooperative Sugar Factory : वृद्धेश्वर कारखाना निवडणूक बिनविरोध? उद्या चित्र होणार स्पष्ट
Vruddheshwar Cooperative Sugar Factory : वृद्धेश्वर कारखाना निवडणूक बिनविरोध? उद्या चित्र होणार स्पष्ट

Vruddheshwar Cooperative Sugar Factory : पाथर्डी : वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या (Vruddheshwar Cooperative Sugar Factory) संचालक मंडळ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज (Application Form) माघार घेण्याचा उद्या (ता. १८) हा शेवटचा दिवस असल्याने निवडणूक (Elections) बिनविरोध होणार की काही जागांसाठी प्रत्यक्ष लढत होणार, याकडे तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

नक्की वाचा : युट्यूबवरील चोरीची क्लृप्ती पाहून उबेर चालकाला लुटले; एमआयडीसी पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात

बहुतांश निवडणुका बिनविरोध

कारखान्याच्या स्थापनेपासून काही अपवाद वगळता कारखान्यावर राजळे घराण्याचे वर्चस्व राहिले आहे. तालुक्याचे राजकारण आमदार मोनिका राजळे, माजी आमदार चंद्रशेखर घुले आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते प्रताप ढाकणे यांच्या भोवती फिरत असले तरी एकमेकांच्या साखर कारखान्यांच्या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप न करण्याची परंपरा राहिल्याने बहुतांश निवडणुका बिनविरोध झाल्याचा इतिहास आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

४१ उमेदवारांचे एकूण ४४ उमेदवारी अर्ज दाखल (Vruddheshwar Cooperative Sugar Factory)

यंदा कारखान्याच्या १९ संचालकपदांसाठी निवडणूक होत असून आतापर्यंत ४१ उमेदवारांचे एकूण ४४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. कारखान्याचे एकूण मतदान ८ हजार ७०८ इतके आहे. अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांपैकी बहुतांश उमेदवार हे राजळे समर्थक असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे विद्यमान संचालकांसह इच्छुकांमध्ये यंदा कोणाला संधी मिळणार आणि कोणाचा पत्ता कट होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते शिवशंकर राजळे यांनी यंदा निवडणूक लढविण्याची भूमिका जाहीर केली आहे. मात्र ते अखेरपर्यंत निवडणुकीच्या मैदानात राहणार की माघार घेणार, याचे उत्तरही माघारीनंतरच मिळणार आहे.

विविध स्तरांवर संपर्क व चर्चांना वेग

दाखल झालेल्या ४१ उमेदवारांपैकी सुमारे ३७ उमेदवार राजळे गटाच्या मर्जीतील असल्याचे बोलले जात आहे. उर्वरित चार उमेदवार हे विरोधी गटाशी संबंधित मानले जात असल्याने त्यांनी उमेदवारी कायम ठेवल्यास काही जागांसाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. मात्र या उमेदवारांनीही माघार घेतल्यास निवडणूक पुन्हा एकदा बिनविरोध होऊ शकते.माघारीच्या अंतिम दिवसाच्या पार्श्वभूमीवर आज (ता. १७) दिवसभर विविध स्तरांवर संपर्क व चर्चांना वेग आला होता. अनेक इच्छुकांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे संकेत देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यामुळे गुरुवारी (ता. १८) माघारीनंतर वृद्धेश्वर कारखान्याच्या निवडणुकीचे नेमके चित्र स्पष्ट होणार असून बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राहते की काही जागांसाठी लढती रंगतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.