Case Registered : पोलीस भरतीच्या तयारीतील तरुणीवर अत्याचार; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी

मोबाईल चार्जरची गरज असल्याचे सांगत घरात प्रवेश

0
Case Registered : पोलीस भरतीच्या तयारीतील तरुणीवर अत्याचार; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी
Case Registered : पोलीस भरतीच्या तयारीतील तरुणीवर अत्याचार; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी

Case Registered : पाथर्डी : तालुक्यातील एका गावातील १८ वर्षीय तरुणीवर अत्याचार करून (Assault on a Young Woman) तिचे अश्लील फोटो काढल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात (Case Registered) आला आहे. तसेच संबंधित फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि पीडितेसह तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी (Death threat) दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

नक्की वाचा : पारनेर तहसील आणि पोलीस ठाणे परिसरात बेशिस्त वाहनांचा विळखा;  वाहतुकीचे नियम धाब्यावर 

मोबाईल चार्जरची गरज असल्याचे सांगत घरात प्रवेश

मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता आणि आरोपी हे दोघेही पोलीस भरतीची तयारी करत असल्याने त्यांच्यात ओळख निर्माण झाली होती. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले होते. दरम्यान, आरोपी तरुण हा मोबाईलद्वारे सतत संपर्क साधत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेच्या दिवशी रात्री उशिरा आरोपीने पीडितेच्या घराचा दरवाजा ठोठावून मोबाईल चार्जरची गरज असल्याचे सांगत घरात प्रवेश केला. त्यानंतर त्याने पीडितेकडे शरीरसुखाची मागणी केली. पीडितेने नकार दिल्यानंतर आरोपीने जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच पीडितेचे अश्लील फोटो मोबाईलमध्ये काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

आरोपीकडून वारंवार फोन (Case Registered)

या घटनेनंतर आरोपीकडून वारंवार फोन, सोशल मीडियावरील संदेश तसेच अश्लील फोटो व व्हिडिओ प्रसारित करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याने पीडिता मानसिक त्रासात होती. अखेर असह्य झालेल्या त्रासामुळे तिने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला आणि पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. पीडितेच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिसांनी संकेत रावसाहेब बडे या संबंधित तरुणाविरुद्ध बलात्कार, धमकी तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.