Stridhan : नगर : भारतात लग्नाच्या वेळी मुलीला हुंडा (Dowry) देणे किंवा घेणे हा कायदेशीर गुन्ह (Legal offense) मानला जातो. मात्र, लग्नात (marriage) मुलीला तिच्या हक्काने ज्या गोष्टी मिळतात, त्याला कायदा (Law) ‘स्त्रीधन’ (Stridhan) मानतो. हिंदू वारसा कायदा १९५६ (Hindu Succession Act, Section 14) नुसार, स्त्रीधनावर केवळ आणि केवळ संबंधित महिलेचाच संपूर्ण मालकी हक्क (Ownership Rights) असतो.
नक्की वाचा : पारनेर तहसील आणि पोलीस ठाणे परिसरात बेशिस्त वाहनांचा विळखा; वाहतुकीचे नियम धाब्यावर
स्त्रीधनामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो?
अनेक महिलांना वाटतं की फक्त सोन्या-चांदीचे दागिने म्हणजेच स्त्रीधन. पण कायद्यानुसार याची व्याख्या खूप मोठी आहे. स्त्रीधनात लग्नापूर्वी, लग्नाच्या वेळी आणि बाळंतपणात मुलीला माहेरून तसेच सासरकडून मिळालेले सर्व सोन्या-चांदीचे दागिने, भेटवस्तू व रोख रक्कम, लग्नात किंवा इतर प्रसंगी भेट म्हणून मिळालेले महागडे कपडे, मौल्यवान वस्तू किंवा रोख रक्कम (कॅश), लग्नानंतर संबंधित महिलेच्या नावाने घेतलेली कोणतीही मालमत्ता (घर, जमीन) किंवा शेअर्स, फिक्स डिपॉझिट्स. मुलीला तिच्या हक्काने मिळालेली प्रत्येक लहान-मोठी वस्तू म्हणजे तिचे ‘स्त्रीधन’ आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पती किंवा सासरच्या लोकांचा स्त्रीधनावर अधिकार असतो का? (Stridhan)
अनेकदा सासरच्या मंडळींना वाटते की लग्नात मिळालेले दागिने किंवा वस्तू ही कुटुंबाची सामूहिक संपत्ती आहे. मात्र, सुप्रीम कोर्टाने आपल्या एका ऐतिहासिक निर्णयात स्पष्ट केले आहे की, स्त्रीधनावर पती किंवा त्याच्या कुटुंबीयांचा कोणताही कायदेशीर हक्क नसतो.जरी एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत पतीने पत्नीचे दागिने वापरले, तरी ते दागिने त्याला नंतर पत्नीला जसेच्या तसे परत करावे लागतात.
स्त्रीधन बळकावल्यास कोणती कायदेशीर कारवाई होऊ शकते?
जर एखादी महिला सासर सोडून जात असेल किंवा घरगुती वादामुळे वेगळी राहत असेल, आणि तिचे सासरचे लोक तिचे स्त्रीधन परत देण्यास नकार देत असतील, तर हा कायद्याने गुन्हा मानला जातो.भारतीय न्याय संहितेनुसार स्त्रीधन बळकावणाऱ्या पती किंवा सासरच्या लोकांविरुद्ध थेट पोलिसांत तक्रार नोंदवता येऊ शकते. यामध्ये दोषी आढळल्यास ३ वर्षापर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे. स्त्रीधन परत मिळवण्यासाठी महिला कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत देखील न्यायालयात दाद मागू शकतात.
स्वतःचा आत्मसन्मान जपा!
आपल्या समाजात अजूनही महिलांना वाटते की आपल्या हक्काचे दागिने किंवा वस्तू मागणे म्हणजे नाती तोडणे किंवा घर उद्ध्वस्त करणे होय. परंतु, कायद्याने दिलेला अधिकार माहिती असणे आणि गरजेच्या वेळी त्याचा वापर करणे म्हणजे अधिकार गाजवणे नसून, स्वतःचा आत्मसन्मान जपणे आहे. त्यामुळे प्रत्येक महिलेला तिच्या ‘स्त्रीधनाचा’ अधिकार माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे.



